Sourav Ganguly : IPL 2021 पूर्ण करण्यात अपयशी ठरलो, तर 2500 कोटींचं होईल नुकसान - सौरव गांगुली

वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, अमित मिश्रा, वृद्धीमान सहा, लक्ष्मीपती बालाजी, माइकल हसी असे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या सदस्यांची नावं आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:44 PM2021-05-06T16:44:33+5:302021-05-06T16:44:56+5:30

whatsapp join usJoin us
If we fail to complete the IPL, the loss will be close to INR 2500 crore: Sourav Ganguly | Sourav Ganguly : IPL 2021 पूर्ण करण्यात अपयशी ठरलो, तर 2500 कोटींचं होईल नुकसान - सौरव गांगुली

Sourav Ganguly : IPL 2021 पूर्ण करण्यात अपयशी ठरलो, तर 2500 कोटींचं होईल नुकसान - सौरव गांगुली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स या संघातील खेळाडू व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगचे 14 वे पर्व ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय BCCIनं घेतला.  या स्पर्धेचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे, परंतु आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता हे थोडं अवघड वाटत आहे. ही स्पर्धा पूर्ण न झाल्यास 2500 कोटींचे नुकसान होईल, अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं दिली. ( BCCI President Sourav Ganguly)  

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले होते की, ''हे सत्र मध्येच स्थगित केल्यामुळे आम्हाला २००० ते २५००० कोटींचे नुकसान होऊ शकतो. माझ्या माहितीनुसार २२०० कोटींचं नुकसान निश्चित आहे.''  स्टार स्पोर्ट्ससोबत पाच वर्षांसाठी १६, ३४७ कोटींचा करार केला गेला आहे. त्यानुसार प्रतीवर्ष ३ हजार २६९ कोटी अशी किंमत होते. जर ६० सामने होतात, तर प्रत्येक सामन्याची राशी ही जवळपास ५४ कोटी ५० लाख इतकी होते. आता २९ सामन्यांनुसार १५८० कोटी इतकी किंमत होते. अशात बोर्डाला १६९० कोटींचा नुकसान होणार आहे IPL 2021 Suspended: मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल

भारताचा माजी कर्णधार गांगुली म्हणाला,''अऩेक फेरबदल करावे लागणार आहेत. अऩ्य बोर्डांशीही चर्चा सुरू आहे आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी उर्वरित आयपीएल खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक गोष्टींवर विचार सुरू आहे आणि हळुहळू काम सुरू होईल. पण, जर आम्ही आयपीएलचा दुसरा टप्पा घेण्यास अपयशी ठरतो, तर जवळपास 2500 कोटींचे नुकसान होईल.'' मुंबई इंडियन्सचा नाद खुळा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार मायदेशी, अन्य फ्रँचायझींनाही मदतीची तयारी!

कोरोनानं बायो बबल कसा भेदला कल्पना नाही - गांगुली
बायो बबल असतानाही कोरोनाचा शिरकाव कसा झाला याची कल्पना नाही. त्याचा तपास आम्ही करून आणि त्यामागचं कारण शोधून काढू. प्रवासाचा मुद्दा गंभीर होता. गतवर्षी यूएईत तीन स्टेडियमवर सामने झाले आणि प्रवासही सुरळीत झाला. हवाई सफर करावा लागला नाही. इथे सहा वेगवेगळ्या मैदनांवर सामने खेळवण्याचं आयोजन केलं होतं, असेही गांगुली म्हणाला. 

Web Title: If we fail to complete the IPL, the loss will be close to INR 2500 crore: Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.