IPL 2021 Suspended: मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल

MS Dhoni केवळ मैदानावर नव्हे, तर मैदानाबाहेरही संघाती खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला पाहायला मिळतोय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:41 AM2021-05-06T10:41:12+5:302021-05-06T10:50:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Suspended: MS Dhoni delays return to Ranchi, will wait for all his teammates to depart - Report | IPL 2021 Suspended: मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल

IPL 2021 Suspended: मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला मानायला हवं... देशातील कोरोना परिस्थिती बिकट होत जात असताना बीसीसीआयनं १० मिनिटांच्या बैठकीत १४वी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान पाहून आधीच घाबरलेले परदेशी खेळाडू, आता घरी जायचं कस, असा सवाल विचारू लागले. त्यात अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या थेट विमानसेवांवर बंदी घातल्यानं परदेशी खेळाडूंची चिंता आणखी वाढली. अशात महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) एक आदर्श घालून दिला आहे. तो केवळ मैदानावर नव्हे, तर मैदानाबाहेरही संघाती खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला पाहायला मिळतोय.  मुंबई इंडियन्सचा नाद खुळा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार मायदेशी, अन्य फ्रँचायझींनाही मदतीची तयारी!

महेंद्रसिंग धोनीनं आपल्या संघातील खेळाडूंना वचन दिलं की जोपर्यंत संघातील शेवटचा व्यक्ती घरी परतण्यासाठी विमानात बसत नाही, तोपर्यंत तो स्वतः रांचीत परतणार नाही. CSKच्या एका सदस्यानं Indian Express ला सांगितले की, हॉटेलमधून बाहेर पडणारा तो अखेरचा व्यक्ती असेल, असे माही भाईनं आम्हाला सांगितले. परदेशी खेळाडूंनी प्रथम त्यांच्या मायदेशासाठी रवाना व्हावे, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी जावे, असा माहिचा आग्रह होता. त्यानंतर ही सर्व खेळाडू आपापल्या घरी सुरखूप पोहोचल्यानंतर माही रांचीला रवाना होणार आहे.''  Fact Check : महेंद्रसिंग धोनीनं IPL २०२१मधून मिळणारा १५ कोटींचा पगार कोरोना लढ्यासाठी केला दान! 

CSKनं त्यांच्या खेळाडू व स्टाफ सदस्यांना घरी पोहोचवण्यासाठी दिल्लीतून चार्टर्ड फ्लाईटची सोय केली आहे. १० जणांसाठीचं हे विमान सकाळी राजकोट व मुंबईला दाखल होईल, त्यानंतर हेच विमान बंगळुरू आणि चेन्नई येथे खेळाडूंना सोडेल. त्यानंतर धोनी गुरुवारी सायंकाळी रांचीसाठी रवाना होईल. CSK प्रमाणेच मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स यांनी त्यांच्या खेळाडूंना घरी पोहोचवण्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय केली आहे. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू व्यावयसायिक विमानांनी आपापल्या ठिकाणी जातील.   

ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवसाठी रवाना...
सनरायझर्स हैदराबादला अद्याप फ्लाईट शेड्युल्ड ठरवता आलेलं नाही. ''आम्ही आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, परंतु अद्याप स्पष्टता मिळालेली नाही, असे SRHच्या मॅनेजरनं सांगितले. त्यांनी Go Air विमान बूक केलं, परंतु बार्बाडोजसाठी ते जाऊ शकत नाही.  तेच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू व स्टाफ सदस्य असा एकूण ४० जणांचा चमू मालदीवसाठी रवाना होणार आहे. १५ मे पर्यंत ऑस्ट्रेलियन सरकारनं भारतातून येणाऱ्या विमानसेवा बंद केल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हा पर्याय अवलंबवावा लागत आहे. 

Web Title: IPL 2021 Suspended: MS Dhoni delays return to Ranchi, will wait for all his teammates to depart - Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.