ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील निकालानंतर WTC गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:10 IST2025-11-16T17:09:55+5:302025-11-16T17:10:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC WTC Points Table 2025 27 Update India Slip To 4th In Standings After Kolkata Test Defeat South Africa in Top 2 | ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप

ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप

कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३० धावांनी आघाडी घेतली होती. पण शेवटी टीम इंडियावर तेवढ्याच धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली. या पराभवासह भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० पिछाडीवर पडला आहे. एवढेच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. 

टीम इंडियाला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेनं मारलं कोलकाताचं मैदान 

कोलकाता कसोटीतील नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १५९ धावांत आटोपले होते. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात १८९  धावा करून ३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १५३ धावा करत टीम इंडियासमोर १२४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडिया शंभरीच्या आत म्हणजे ९३ धावांवर आटोपली. इथं एक नजर टाकुयात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील निकालानंतर WTC गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर? यासंदर्भातील सविस्तर माहिती

टीम इंडिया फटका, दक्षिण आफ्रिकेची उंच उडी

कोलकाता येथील कसोटी सामन्या आधी भारतीय संघ ६१.९० विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहोत. या पराभवानंतर टीम इंडिया ५४.१७ विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या सामन्यातील विजयासह ३ सामन्यातील २ विजय आणि १ पराभवासह ६६.६७ विनिंग पर्सेंटेजसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

ICC WTC Points Table मध्ये कोणता संघ कितव्या स्थानी?

क्रमांकसंघसामनेविजयपराभवबरोबरीकपातगुणविजय टक्केवारी
ऑस्ट्रेलिया (AUS)३६१००.०० टक्के
दक्षिण आफ्रिका (SA)२४६६.६७ टक्के
श्रीलंका (SL)0१६६६.६७ टक्के
भारत (IND)५२५४.१७ टक्के
पाकिस्तान (PAK)१२५०.०० टक्के
इंग्लंड (ENG)२६४३.३३ टक्के
बांगलादेश (BAN)0१६.६७ टक्के
वेस्ट इंडिज (WI)०.०० टक्के

Web Title: ICC WTC Points Table 2025 27 Update India Slip To 4th In Standings After Kolkata Test Defeat South Africa in Top 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.