ICC WTC Final: भारतीय संघानं केली आयसीसीकडे न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; मैदानाबाहेर सुरू झाला वेगळाच सामना 

ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायलनच्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:14 PM2021-06-16T12:14:13+5:302021-06-16T12:14:44+5:30

whatsapp join usJoin us
ICC WTC Final: Team India alleges, ’6 New Zealand players breached Bio-Bubble’, BCCI likely to complain to ICC | ICC WTC Final: भारतीय संघानं केली आयसीसीकडे न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; मैदानाबाहेर सुरू झाला वेगळाच सामना 

ICC WTC Final: भारतीय संघानं केली आयसीसीकडे न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; मैदानाबाहेर सुरू झाला वेगळाच सामना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायलनच्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय संघानं मंगळवारी WTC Finalसाठी अंतिम 15 खेळाडूंची नावे जाहीर करून न्यूझीलंडच्या आव्हानासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला. न्यूझीलंडनंही WTC Final सामन्यापूर्वी इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 1-0 असे पराभूत करून टीम इंडियाला वॉर्निंग दिली. 18 जूनपासून WTC Final ला सुरूवात होणार आहे, परंतु त्याआधीच मैदानाबाहेर दोन्ही संघांमध्ये वेगळाच सामना रंगलेला पाहायला मिळत आहे.  Cricbuzzनं दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाच्या व्यवस्थापनानं न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंविरोधात ICCकडे तक्रार केली आहे. 

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'त्या' कृतीमुळे शेअर बाजार गडगडला, Coca Colaला USD 4 billion चा फटका बसला!

न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंनी बायो-बबल नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार टीम इंडियाच्या व्यवस्थापकीय टीमने केली आहे. या सहा खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, डॅरील मिचेल व फिजिओ टॉमी सिम्सेक यांचा समावेश आहे. या सर्वांना बायो-बबल नियम मोडून गोल्फ खेळण्यास गेल्याचा आरोप टीम इंडियाकडून करण्यात आला आहे. दोन्ही संघांची एजीस बॉऊल येथील हिल्टन हॉटेलमध्ये  सोय करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमानुसार टीम इंडिया आणि त्यांचे कुटुंबीय एकाच माळ्यावर थांबले होते, तर न्यूझीलंडचे खेळाडू गोल्फ खेळायला गेले होते. किवी खेळाडूंच्या या वागणुकीवर टीम इंडियाच्या व्यवस्थापनानं नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बीसीसीआयनंआयसीसीकडे तक्रार केली. (As per the ICC protocols, Indian team and their families have remained on their floors at the hotel – but contrary to that New Zealand members have gone out to play Golf)

WTC Final 2021: ...अन् भारतीय संघ ऐतिहासिक कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडकला!

''संघ व्यवस्थापनाकडून आम्हाला याबाबत माहिती मिळाली. आयसीसीनं दोन्ही संघांसाठी सारखेच नियम तयार करायला हवेत. आयसीसी अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा आम्ही मांडला आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले. हॉटेलच्या आवारातच गोल्फ कोर्स असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाला वाटते.  दरम्यान, आयसीसीनंही कोणत्याच नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट केले.

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग  

भारताचा संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्घीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज  
 
 

 

Web Title: ICC WTC Final: Team India alleges, ’6 New Zealand players breached Bio-Bubble’, BCCI likely to complain to ICC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.