ICC WTC Final: BCCIची Doorstep सुविधा; इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंची घरोघरी जाऊन करणार कोरोना चाचणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:13 PM2021-05-12T12:13:00+5:302021-05-12T12:13:54+5:30

या दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही सोबत घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयनं खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ICC WTC Final: BCCI arranges doorstep COVID-19 test for Virat Kohli’s England-bound Team India | ICC WTC Final: BCCIची Doorstep सुविधा; इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंची घरोघरी जाऊन करणार कोरोना चाचणी!

ICC WTC Final: BCCIची Doorstep सुविधा; इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंची घरोघरी जाऊन करणार कोरोना चाचणी!

Next
ठळक मुद्देजागतिक अजिंक्यपद स्पर्धेची फायनल अन् इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाखेळाडूंना दोन टप्प्यात 18 दिवस रहावे लागेल क्वारंटाईन

ICC WTC Final: आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी (  ICC World Test Championship Final against New Zealand ) भारतीय संघ 2 जूनला लंडनसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही फायनल 18 ते 23 जून या कालावधीत होणार आहे, त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं 20 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली. या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना 19 मे रोजी मुंबईत दाखल होण्यास सांगितले आहे. मुंबईत आठवडाभर बायो बबलमध्ये राहिल्यानंतर खेळाडू लंडन दौऱ्यासाठी रवाना होतील. पण, ज्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर त्याचा लंडन दौरा रद्द, असे स्पष्ट संकेत बीसीसीआयनं दिले आहेत. IPL 2021 Remaining Matches : सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; पाकिस्तान ठरतंय त्यासाठी कारणीभूत!

या दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही सोबत घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयनं खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएलमध्ये केलेल्या चूका बीसीसीआयला टाळायच्या आहेत आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.  

बीसीसीआय त्यांची वैद्यकीय टीम प्रत्येक खेळाडूच्या घरी पाठवणार आहे. यावेळी खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात येईल. येत्या काही दिवसांत याला सुरूवात होईल, त्यासाठी बीसीसीआयनं खेळाडूंशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंच्या घरी RT-PCR कसोटी होणार आहे. लंडनला जाणाऱ्या संघातील 90 टक्के खेळाडूंनी कोरोना  लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना पुढील तीन महिन्यांत कोरोनाचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. पण, भारतीय संघ पुढील तीन-साडेतीन महिने इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तेथेच त्यांना दुसरा डोस दिला जाईल. भारताच्या श्रीलंका दौऱ्याला कोरोनाची लागली नजर; प्रेक्षकांसाठी वाईट बातमी

जागतिक कसोटी अजिंक्यपद व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेला संघ
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव; लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला. वेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला भारताचा रॉबिन सिंग?; टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला परदेशी खेळाडू

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ICC WTC Final: BCCI arranges doorstep COVID-19 test for Virat Kohli’s England-bound Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app