India's tour to Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्याला कोरोनाची लागली नजर; प्रेक्षकांसाठी वाईट बातमी

India's tour to Sri Lanka : बीसीसीआय येत्या जुलै महिन्यात टीम इंडियाची दुसरी फळी श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यासाठी सज्ज झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:52 AM2021-05-12T10:52:41+5:302021-05-12T10:52:56+5:30

whatsapp join usJoin us
India's tour to Sri Lanka: Increasing Covid cases in island a worry, all matches will be closed-door  | India's tour to Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्याला कोरोनाची लागली नजर; प्रेक्षकांसाठी वाईट बातमी

India's tour to Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्याला कोरोनाची लागली नजर; प्रेक्षकांसाठी वाईट बातमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बीसीसीआय येत्या जुलै महिन्यात टीम इंडियाची दुसरी फळी श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यासाठी सज्ज झाली आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. पण, या दौऱ्यावर कोरोनाचे संकट ओढावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. श्रीलंकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागल्यानं भारताचा दौरा संकटात सापडू शकतो. मंगळवारी कोलंबोत 2568 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि त्यापैकी 38 जण हे प्रवास करून मायदेशात आले होते.

9 व 10 मे रोजी येथील कोरोना रुग्णांचा आकडा हा अनुक्रमे 2672 व  2624 असा नोंदवण्यात आला. अशात श्रीलंका क्रिकेट मंडळानेही सामने झालेच तर ते प्रेक्षकांविना होतील, अशी भूमिका घेतली आहे. या मालिकेचे सर्व सहा सामने कोलंबो क्रिकेट स्टेडियमवर होतील. ''एकाच स्टेडियमवर हे सामने खेळवण्याचा आमचा विचार आहे. सध्या तरी हे सामने प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्याचे ठरत आहे. पण, आजूबाजूची परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल,'' असे श्रीलंका क्रिकेटचे चेअरमन अर्जुन डी सिल्व्हा यांनी सांगितले. वेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला भारताचा रॉबिन सिंग?; टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला परदेशी खेळाडू

धवन, हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत
जखमी श्रेयस अय्यर मर्यादित षटकांच्या या दौऱ्याआधी फिट न झाल्यास अनुभवी सलामीवीर शिखर धवन तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यापैकी एकाची कर्णधारपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेला श्रेयस अय्यर हा श्रीलंका दौऱ्याआधी तंदुरुस्त होईल का हे निश्चित नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण होण्यास किमान चार महिन्यांचा कालावधी जातो. जर श्रेयस उपलब्ध असेल तर तोच नेतृत्व करण्यासाठी प्रथम पसंती असेल. त्याचप्रमाणे, शिखर धवन आणि हार्दिक पांड्या हेदेखील शर्यतीत आहेत. शिखरने आयपीएलच्या दोन पर्वांत प्रभावी कामगिरी केली. अनुभवी या नात्याने नेतृत्वाच्या शर्यतीत सर्वांत पुढे आहे. हार्दिकबाबत बोलाल तर ‘मॅचविनर’या नात्याने त्याचा दावादेखील भक्कम असेल. नेतृत्वाची अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यांनतर तुमची कामगिरी कशी होईल, हे सांगता येत नाही.’

वृत्तानुसार भारतीय संघ ५ जुलै रोजी लंकेत दाखल होईल. सर्व खेळाडू आठवडाभर क्वॉरंटाईन राहतील. हा कालावधी संपल्यानंतर १३ जुलैपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २२ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. त्यावेळी परिस्थिती कशी असेल यावर सामन्यांचे आयोजन विसंबून असल्याचे डिसिल्व्हा म्हणाले.

Web Title: India's tour to Sri Lanka: Increasing Covid cases in island a worry, all matches will be closed-door 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.