WTC Final पूर्वी रवींद्र जडेजाला मिळाली मनोबल उंचावणारी न्यूज; आता न्यूझीलंडचं काही खरं नाही!

भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी (ICC WTC Final) लंडनमध्ये दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:21 PM2021-06-09T16:21:40+5:302021-06-09T16:22:17+5:30

whatsapp join usJoin us
ICC Test Rankings: R Jadeja climbs to No.2 spot among allrounders, R Ashwin stays at No.2 among bowlers | WTC Final पूर्वी रवींद्र जडेजाला मिळाली मनोबल उंचावणारी न्यूज; आता न्यूझीलंडचं काही खरं नाही!

WTC Final पूर्वी रवींद्र जडेजाला मिळाली मनोबल उंचावणारी न्यूज; आता न्यूझीलंडचं काही खरं नाही!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी (ICC WTC Final) लंडनमध्ये दाखल झाला आहे. सध्या भारतीय खेळाडू विलगिकरणात असले तरी त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि रवींद्र जडेजानं ( ravindra jadeja) ही संधी वाया जाऊ दिलेली नाही. 18 जूनपासून सुरू होणाऱ्या या फायनलकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या जडेजाच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष आहे. या सामन्यापूर्वी जडेजाला आयसीसीनं आनंदाची बातमी दिली आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूनं दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, तर फिरकीपटू आर अश्विन गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी कायम आहे.  आयसीसीनं बुधवारी कसोटी क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली. आर अश्विन अष्टपैलू खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानावर कायम आहे. जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये या दोघांकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. ( ICC Test Rankings: R Jadeja climbs to No.2 spot among allrounders, R Ashwin stays at No.2 among bowlers) 

अष्टपैलू खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर 423  गुणांसह अव्वल स्थानी आहे. जडेजा ( 386), इंग्लंडचा बेन स्टोक्स ( 385), अश्विन ( 353) आणि बांगालदेशचा शाकिब अल हसन ( 338) हे  टॉप फाईव्हमध्ये आहेत. जडेजानं स्टोक्सला तिसऱ्या स्थानी खेचले. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 908 गुणांसह टॉपवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनच्या खात्यात 850 गुण आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेणाऱ्या न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं गोलंदाजांमध्ये 838 गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली. जोश हेझलवूड व निल वॅगनर प्रत्येकी 816 गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे. अश्विन वगळता टॉप टेनमध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही.

फलंदाजांच्या क्रमवारीत फार बदल नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 895 गुणांसह  टॉपवर आहे. स्टीव्ह स्मिथ ( 891) व मार्नस लाबुशेन ( 878)  ही ऑस्ट्रेलियन जोडी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट 836 गुणांसह चौथ्या, तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 814 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. रिषभ पंत व रोहित शर्मा प्रत्येकी 747 गुणांसह सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहेत.

Web Title: ICC Test Rankings: R Jadeja climbs to No.2 spot among allrounders, R Ashwin stays at No.2 among bowlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.