ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी?

गेली 24 तास या पोलसंदर्भात सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू होती. या पोलच्या अखेरच्या क्षणी बुधवारी कोहली आणि इम्रान खान यांच्यात जबरदस्त चुरस बघायला मिळाली.

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 13, 2021 03:05 PM2021-01-13T15:05:57+5:302021-01-13T15:08:11+5:30

whatsapp join usJoin us
ICC poll Imran khan wins ahead of Indian cricketer virat kohli in battle of supremes | ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी?

ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयसीसीने गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक पोल सुरू केला होता.गेली 24 तास या पोलसंदर्भात सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू होती.या दोघांशीवाय या पोलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स आणि ऑस्ट्रेलियतील महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंगचाही समावेश होता.

नवी दिल्ली -विराट कोहली आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार तसेच सध्याचे पंतप्रधान इम्रान खान हे आपापल्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत. खरे, तर या दोघांचाही काळ भिन्न आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने (आयसीसी)  घेतलेल्या एका पोलमध्ये या दोन्ही क्रिकेटर्समध्ये जबरदस्त फाईट बघायला मिळाली.

आयसीसीने घेतला असा पोल -
आयसीसीने गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक पोल सुरू केला होता. यात आयसीसीने चार खेळाडूंचे फोटो टाकत लिहिले होते, "कर्णधार झाल्यानंतर काही खेळाडूंचा खेळ अधिक चांगला झाला. आपल्या संघाचे नेतृत्व करताना यांच्या अॅव्हरेजचा आलेखही चांगल्या प्रकारे वाढला. आता तुम्हीच ठरवा, या प्रतिभासंपन्न खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्कृष्ट आहे." यात कर्णधार म्हणून सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड करायची होती.

गेली 24 तास या पोलसंदर्भात सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू होती. या पोलच्या अखेरच्या क्षणी बुधवारी कोहली आणि इम्रान खान यांच्यात जबरदस्त चुरस बघायला मिळाली. मात्र, अखेरच्या क्षणी इम्रान खान या पोलमध्ये बाजी मारण्यात यशस्वी ठरले. या दोघांशीवाय या पोलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स आणि ऑस्ट्रेलियतील महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंगचाही समावेश होता. भारतात ट्विटरवर सातत्याने विराट कोहलीला मतदान करण्यासाठी चाहते आवाहन करत होते. एवढेच नाही, तर हा क्रमांक 1 चा ट्रेंडदेखील झाला होता.

पोलमध्ये पाच लाखहून अधिक मते - 
आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर घेतलेल्या या पोलमध्ये एकूण 5.36 लाख मते करण्यात आली. यांपैकी इम्रान खानला 47.3 टक्के, विराट कोहलीला 46.2 टक्के, डिव्हिलियर्सला 6 तर लॅनिंगला 1 टक्का मते मिळाली.

Web Title: ICC poll Imran khan wins ahead of Indian cricketer virat kohli in battle of supremes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.