भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्यानं दुखापतीतून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तो अधिक काळ सोशल मीडियावरच सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात त्याच्या आणि मॉडल नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या नात्याच्या चर्चाही रंगत आहेत. त्यांना बळ देणारा प्रसंग रविवारी मुंबईत पाहायला मिळाला. हार्दिक आणि नताशा हे दोघेही मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र डीनर घेऊन बाहेर पडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खरच हार्दिक आणि नताशा यांचं प्रेमप्रकरण आहे का, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

इंस्टाग्रामवर रंगला प्रेमाचा खेळ, हार्दिक पांड्या म्हणतो... फक्त तू आणि तूच!

काही दिवसांपूर्वी हार्दिकनं नताशाची भेट त्याच्या कुटुंबीयांशीही करून दिली होती. काही महिन्यांपूर्वी हार्दिक नताशासोबत वांद्रे येथे दिसला होता. त्याच्या मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टित तो नताशाला घेऊन आला होता. नताशासोबतच्या नात्याबद्दल हार्दिक अधिक गंभीर आहे आणि त्यानं पार्टित तिची ओळख कुटुंबियांशी करू दिली.या पार्टित हार्दिकचा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडी शर्मा उपस्थित होते. या पार्टित हार्दिकनं नताशाची ओळख त्याचा गर्लफ्रेंड म्हणून सर्वांशी करून दिली.  


मुळची सर्बियाची असलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षीय डान्स शिकायला सुरुवात केली. 2010मध्ये स्पोर्ट्स सर्बिया या किताब जिंकल्यानंतर तिनं स्पोर्ट्समध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. तिने नच बलिए 9 सीजनमध्ये सहभाग घेतला होता. एली गोनी आणि प्रियांक शर्मा यांच्याशीही नताशाचे नाव जोडले गेले आहे. यापूर्वी हार्दिकचे नाव इशा गुप्ता, अॅली अव्हराम आणि उर्वशी रौलेताशी जोडले गेले आहे.

रविवारी नताशा आणि हार्दिक पुन्हा एकदा सोबत दिसले. 

Web Title: Hardik Pandya spotted with Natasha Stankovic after dinner date in Mumbai, affair rumours get strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.