लंडन : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर हार्दिकला भेटण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी गेल्या होत्या. हार्दिकचा शनिवारी वाढदिवस होता आणि नीता अंबानी यांनी त्याला शुभेच्छा दिला. हार्दिकचा वाढदिवस आणि त्याच्या जवळच्या व्यक्तीनं शुभेच्छा दिल्या नाही, असं होईल का? हार्दिक आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्यातील सोशल मीडियावरील प्रेमचा खेळ सध्या व्हायरल झाला आहे. त्यात हार्दिकनं फक्त तू आणि तूच असा रिप्लाय दिलेला पाहायला मिळत आहे.

हार्दिक पांड्यानं दिली प्रेमाची जाहीर कबुली; इंस्टाग्रामवर लव्ह बर्डचा लपंडाव

हार्दिकलवर इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दुखापतीमुळे हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्याला मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागू शकते. भारतीय क्रिकेटपटूंनी हार्दिकला लवकर बरा हो, असे मॅसेज पाठवले आहेत. हार्दिकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत दुखापत झाली होती. ही दुखापत त्यावेळीही गंभीर होती. कारण त्यावेळी हार्दिकला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर हार्दिक दुखापतीमधून सावरला होता. लंडनमध्ये झालेल्या विश्वचषकातही हार्दिक खेळला होता.  

हार्दिकनं काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे, त्यात आणखी एकीची भर पडली आहे. या अभिनेत्रीसोबतचं नातं इतकं सीरियस आहे की हार्दिकनं चक्क घरच्यांशी तिची ओळख करून दिली होती. रविवारी या दोघांनी प्रेम कबुल केले. नताशा स्टॅनकोव्हिक असे या अभिनेत्रीचे नाव आहे. हार्दिक नताशाला डेट करत असल्याचीही चर्चा होती. काही दिवसांपूर्वी हार्दिक नताशासोबत वांद्रे येथे दिसला होता. त्याच्या मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीत तो नताशाला घेऊन आला होता. नताशासोबतच्या नात्याबद्दल हार्दिक अधिक गंभीर आहे आणि त्यानं पार्टीत तिची ओळख कुटुंबियांशी करू दिली. या पार्टीत हार्दिकचा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडी शर्मा उपस्थित होते. 

नताशानं शनिवारी हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात तिनं हार्दिकचा बेस्ट फ्रेंड असा उल्लेख केला. ''हे वर्ष तुझ्यासाठी चढउताराचे राहिले. तू त्यातही सक्षमपणे उभा राहिलाच, तुझा सार्थ अभिमान. मी तुझ्या नेहमी पाठीशी उभी आहे,''असे नताशानं लिहिले. त्यावर हार्दिकनंही मजेशीर उत्तर दिले. त्यानं लिहिले की,''तुझ्या या शुभेच्छांनी माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवले. फक्त तू आणि तूच माझ्या चांगल्या-वाईट काळात सोबत राहिलीस, त्याबद्दल तुझे आभार.'' 

Web Title: Actress Natasa Stankovic wish Hardik Pandya on his Birthday, cricketer give lovely reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.