टीम इंडियाच्या खेळाडूचा चिनी ब्रँड्सवर बहिष्कार; जाहिरातही न करण्याचा निर्धार

IPL मोठं की ब्रँड याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 06:10 PM2020-06-20T18:10:12+5:302020-06-20T18:11:40+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan Singh confirms he won't endorse Chinese products from now | टीम इंडियाच्या खेळाडूचा चिनी ब्रँड्सवर बहिष्कार; जाहिरातही न करण्याचा निर्धार

टीम इंडियाच्या खेळाडूचा चिनी ब्रँड्सवर बहिष्कार; जाहिरातही न करण्याचा निर्धार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देचिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची केली होती मागणीVIVOची टायटल स्पॉन्सरशीप काढून टाकण्यासही दिला पाठिंबा

लडाखमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी आणि गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे .देशातील सर्व स्तरांमधून चीनचा निषेध करून चीन आणि चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) त्यांच्या चिनी प्रायोजकांवर बहिष्कार घालतील का, हा मुद्दा सध्या चर्चिला जात आहे. त्यातच व्यापार आणि उद्योग संघटनेनं ( CTI) बीसीसीआयचा पत्र पाटवून चिनी कंपनींसोबतचे सर्व करार संपुष्टात आणण्यास सांगितले आहे. पण, आता टीम इंडियाच्या खेळाडूनंही चिनी ब्रँड्सवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालमधील चित्रपट सृष्टीतील कामगारांसाठी सौरव गांगुलीची 10 लाखांची मदत

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग चीनवर चांगलाच खवळला आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. त्याच्या या मागणीनंतर चिनी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’चे मुख्य संपादक ह्यू झिजींग यांनी टीका केली.  त्यांनी ट्विट केलं की,''चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी अनेक सेलिब्रेटी करत आहेत. त्यात भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचाही समावेश आहे. त्याचे हे वत्यव्य म्हणजे जगासमोर भारतीय संस्कृतीची नकारात्मक छबी पसरवण्याचे काम आहे.''
भज्जीनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आता चिनी ब्रँड्सच्या जाहिराती करणार नसल्याचे जाहीर केले. तो

म्हणाला,''आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे असेल, तर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. सर्वकाही भारतात निर्माण केलं गेलं पाहिजे. आपल्याकडे तेवढी क्षमता आहे. आपल्याला चिनी वस्तूंवर बंदी घालायची आहे, तर हे करायलाच हवं. ते आपल्या देशावर आणि सैनिकांवर हल्ला करत असतील, तर त्यांच्या वस्तूंवर बंदी घातलीच गेली पाहिजे. आपल्या पैशांवर त्यांचा देश का चालवायचा? चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी करणाऱ्यांसोबत मी आहे.''

''चिनी ब्रँड्सची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रेटींकडे अनेक लोकं बोटं दाखवतात. त्यांना मी सांगू इच्छितो की, मी त्यातला नाही. चिनी स्पॉन्सरशिवाय जगात अनेक स्पॉन्सर आहेत. आता आयपीएल मोठा आहे की ब्रँड, याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आयपीएलला कोणत्याही ब्रँडची गरज नाही. यापुढे मी चिनी ब्रँड्सची जाहिरात करणार नाही,'' असेही त्यानं स्पष्ट केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Shocking : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण 

बीसीसीआयवर वाढता दबाव; चिनी कंपनींसोबतचे करार संपुष्टात आणा, अन्यथा...

माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम

बाबो; 20 सेकंदाचा 'सोपा' व्यायाम जमतो का बघा; हरभजन सिंगनं शेअर केलेला Video Viral

चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक

युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो

गरजूंच्या मदतीसाठी निम्मं वेतन दान करणाऱ्या क्रिकेटपटूला झाला कोरोना!

Web Title: Harbhajan Singh confirms he won't endorse Chinese products from now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.