HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

सचिन तेंडुलकरचा आज 47 वा वाढदिवस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 11:33 IST2020-04-24T11:31:08+5:302020-04-24T11:33:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
HappyBirthdaySachin : Virat Kohli, Sourav Ganguly lead wishes; Cricketing world celebrate Tendulkar's 47th Birthday svg | HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

सचिन, सचिन, सचिन.... हा नारा आजही कानावर पडला की अंगावर शहारे उभे राहतात. क्रिकेटचा असा एकही चाहता नाही की ज्यानं सचिन नावाचा गजर केला नसेल... क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर आदी अनेक नावांनी आपण सचिन तेंडुलकरला ओळखतो. सचिन तेंडुलकरचा आज 47 वा वाढदिवस आहे. तेंडुलकरला क्रिकेट विश्वाकडून शुभेच्छा मिळत आहेत.

HappyBirthdaySachin : सचिननं 26/11 हल्ल्यातील शहिदांना वाहिली होती अनोखी श्रद्धांजली...

 

HappyBirthdaySachin : अंजलीला 'डेट' करण्यासाठी सचिन तेंडुलकर सरदार बनला, अन्...

 














 

सचिन तेंडुलकर वाढदिवस साजरा करणार नाही

कोरोनाविरुद्धच्या लढाईत योद्ध्याची भूमिका बजावत असलेला दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर हा ४७ वर्षांचा झाला आहे. तथापि यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा त्याने निर्णय घेतला. ‘ही आनंद साजरा करण्याची वेळ नाही. कोरोनाविरुद्ध लढणारे डॉक्टर नर्सेस, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सैनिकांप्रति आदर व्यक्त करण्याची वेळ असल्याचे,’सचिनच्या निकटवर्तीयांचे मत आहे. सचिनने कोरोनाविरुद्ध लढासाठी ५० लाख रुपये दान दिले आहेत.

Web Title: HappyBirthdaySachin : Virat Kohli, Sourav Ganguly lead wishes; Cricketing world celebrate Tendulkar's 47th Birthday svg