ठळक मुद्देदुखापतग्रस्त असूनही खेळाडूंनी दाखवलेल्या खेळाचं अनेकांनी केलं कौतुकसामना अनिर्णीत ठेवण्यास भारताला मिळालं यश
India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग Ricky Ponting यानं टीम इंडिया Team India दुसऱ्या डावात दोनशे धावाही करणार नाही, असा दावा केला. पण, टीम इंडियानं संघर्ष करताना त्याचा दावा फोल ठरवला सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया पाचव्या दिवशी शरणागती पत्करेल असा तर्क लावला गेला. पण, दुखापतग्रस्त खेळाडूंसह टीम इंडियानं संयमी खेळ केला. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीसह रिषभ पंत मैदानावर उतरला आणि धावांचा पाऊस पाडला. अशातच सचिन तेंडुलकर, व्हीहीएस लक्ष्मण, आनंद महिंद्रा इतकंच काय आयसीसीनंही भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं. परंतु भारतीय जनता पक्षाचे खासदार बाबुल सुप्रियो Babul Supriyos यांनी हनुमा विहारीच्या खेळीबद्दल वादग्रस्त ट्वीट केलं आहे.
“फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडूंचा सामना केला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारलं नाही तर त्यानं क्रिकेटची हत्याही केली. मला क्रिकेटमधलं अधिक कळत नाही हे माहित आहे," असं बाबुल सुप्रियो यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
"जर हनुमा विहारीनं पुढाकार घेऊन खराब चेंडू सीमापार धाडले असते तर कदाचित भारताला कदाचित ऐतिहासिक विजय मिळाला असता. पंतनं कोणीही अपेक्षा केली नव्हती अशी कामगिरी करून दाखवली. हनुमा विहारी हा सेट बॅट्समन होता त्यानं केवळ खराब चेंडू सीमापार धाडायला हवे होते," असंही ते म्हणाले.