Full schedule of 2020 Under-19 Cricket World Cup, know Team India match date & time | टीम इंडिया आणखी एक वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
टीम इंडिया आणखी एक वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पुरुष व महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. पण, तत्पूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत वेस्ट इंडिज आणि भारत यांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. 

भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान टीम इंडियानं पटकावला आहे. यावेळीही टीम इंडियाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि दी वॉल राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं जेतेपद पटकावले होते. यंदा प्रियाम गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. पण, भारतासाठी जेतेपद कायम राखणं इतकं सोपं नसेल. जाणून घेऊया संपूर्ण वेळापत्रक...

अ गट  - भारत, जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका
ब गट - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया आणि वेस्ट इंडिज
क गट - बांगलादेश, पाकिस्तान, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे
ड गट - अफगाणिस्तान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती

भारताचे सामने
19 जानेवारी - वि. श्रीलंका
21 जानेवारी - वि. जपान 
24 जानेवारी - वि. न्यूझीलंड

Web Title: Full schedule of 2020 Under-19 Cricket World Cup, know Team India match date & time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.