IPL 2021 मध्ये CSKविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या माजी गोलंदाजावर ६ वर्षांची बंदी!

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 04:54 PM2021-04-28T16:54:20+5:302021-04-28T16:55:52+5:30

whatsapp join usJoin us
Former Sri Lanka player and coach Nuwan Zoysa banned for six years under ICC Anti-Corruption Code | IPL 2021 मध्ये CSKविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या माजी गोलंदाजावर ६ वर्षांची बंदी!

IPL 2021 मध्ये CSKविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या माजी गोलंदाजावर ६ वर्षांची बंदी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सामना रंगणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील ( Indian Premier League) या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी SRH संघाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. Sunrisers Hyderabad संघाचा माजी जलदगती गोलंदाज नुवान जोएसा ( Nuwan Zoysa) याच्यावर सहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हैदराबाद डेक्कन चार्जर्स संघाकडून तो आयपीएलमध्ये खेळला होता. आयसीसीच्या अँटी करप्शन ट्रिब्यूनलनं आयसीसी अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याप्रकरणी नुवानवर ही कारवाई केली आहे. नुवानची ही बंदी ३१ ऑक्टोबर २०१८ पासून लागू होणार आहे. कडक सॅल्युट!; इरफान व युसूफ पठाण कोरोना रुग्णांना पुरवतायत मोफत अन्न; ट्विट केला हेल्पलाईन नंबर

श्रीलंकेचा हा गोलंदाज आयपीएलच्या पहिल्या पर्वात २००८मध्ये हैदराबाद डेक्कन चार्जर्सकडून तीन सामने खेळला होता. त्यानंतर या संघाचं नाव बदलून सनरायझर्स हैदराबाद ठेवण्यात आलं. डावखुऱ्या जलदगती गोलंदाजानं भ्रष्टाचार केल्याची माहिती आयसीसीकडून लपवलीच नाही, तर अन्य खेळाडूंनाही भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहित केलं. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा प्रयत्नाचा आरोप लावला आहे.  IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार; अजिंक्य रहाणेही RRमध्ये परतणार?

नुवाननं श्रीलंकेकडून ३० कसोटी व ९५ वन डे सामने खेळला आणइ त्यात त्यानं अनुक्रमे ६४ व १०८ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या तीन चेंडूवर हॅटट्रिक घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्यानं १९९९मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे कसोटीत हा विक्रम नोंदवला होता. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये एकूण ५६४ विकेट्स आहेत. IPL 2021 : वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भारतीय खेळाडूनं घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

Web Title: Former Sri Lanka player and coach Nuwan Zoysa banned for six years under ICC Anti-Corruption Code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.