IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार; अजिंक्य रहाणेही RRमध्ये परतणार?

देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसलेला पाहायला मिळत आहे.

देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसलेला पाहायला मिळत आहे.

राजस्थान रॉयल्सचे दोन प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर यांनी आधीच दुखापतीमुळे आयपीएल २०२१मधून माघार घेतली असताना लायम लिव्हिंगस्टोन व अँड्य्रू टाय यांनी बायो बबलमुळे आलेल्या थकव्यामुळे माघार घेतली आणि ते मायदेशी परतलेही.

चार परदेशी खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे RRकडे आता जोस बटलर, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस व मुश्ताफिजून रहमान हे चारच परदेशी पर्याय उरले आहेत. त्यामुळे आता सुरू झालेल्या मिड विंडो ट्रान्सफरमध्ये RR अन्य संघांकडून खेळाडू लोनवर म्हणजेच उधारीवर घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोणत्याही फ्रँचायझीला त्यांच्याकडील खेळाडूंपैकी तीनहून अधिक खेळाडूंना एकाच फ्रँचायझीला 'लोन'वर देता येणार नाही. राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सकडे ओपनर रॉबिन उथप्पासाठी विनंती केली आहे. उथप्पा आयपीएल २०२१त CSKकडून अद्याप एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळे तो आयपीएलच्या नियमानुसार ट्रान्सफरसाठी पात्र ठरत आहे.

रॉबिन उथप्पा आयपीएल २०२०मध्ये राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता, परंतु त्याला रिलीज केले गेले. त्यानं मागच्या पर्वात १२ सामन्यांत १९६ धावा केल्या होत्या.

अजिंक्य रहाणेही राजस्थान रॉयल्सचा सदस्य बनू शकतो. त्यानं आयपीएल २०२१मध्ये दोन सामने खेळले आहेत. नियमानुसार दोन किंवा त्यापेक्षा सामने खेळलेल्या खेळाडूची बदली होऊ शकते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून अजिंक्यला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी RR प्रयत्न करू शकतात.

मुंबई इंडियन्सच्या जिमी निशॅमसाठीही राजस्थान प्रयत्न करू शकते. निशॅमला मुंबईनं अद्याप एकही सामना खेळवलेला नाही.

राजस्थान रॉयल्स पाचपैकी २ सामने जिंकून गुणतालिकेत ७व्या स्थानावर आहेत.

Read in English