Former India captain Rahul Dravid trolled the senior journalist Rajdeep Sardesai with a fitting reply, Video | Video : महेंद्रसिंग धोनी/विराट कोहली स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठे समजतात का?; राहुल द्रविडच्या उत्तरानं केली बोलती बंद

Video : महेंद्रसिंग धोनी/विराट कोहली स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठे समजतात का?; राहुल द्रविडच्या उत्तरानं केली बोलती बंद

सोशल मीडियावर सध्या राहुल द्रविडचा ( Rahul Dravid) इंदिरानगरचा गुंडा हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत राहुल द्रविड जसा आहे त्याच्या परस्पर विरोधी वागताना दिसत आहे. तो चिडचिड करतोय, लोकांना शिव्या देतोय, भांडण करतोय अन् चक्क बॅटीनं इतरांच्या गाडीची काच तोडताना दिसत आहे. हा द्रविड पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) लाही शॉक बसला. आता द्रविडचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यात त्यानं दिलेल्या उत्तरानं वरिष्ठ पत्रकार ट्रोल झालेला पाहायला मिळत आहेत. ICCकडून कोलकाता नाईट रायडर्सच्या माजी प्रशिक्षकावर ८ वर्षांची बंदी

या व्हिडीओत पत्रकार राहुल द्रविडला विचारत आहेत की,''खेळाडू स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठं समजतात का?, महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती कधी घ्यावी, हे तो स्वतः ठरवतो, संघाचा प्रशिक्षक कोण असावा हे विराट कोहली ठरवतो. हे खेळाडू स्वतःला खेळापेक्षा मोठे समजायला लागलेत का?'' IPL 2021: पर्यावरण स्नेही रोहित शर्मा; KKRविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा हिटमॅनच्या बुटांची चर्चा!

यावर राहुल द्रविड म्हणाला,''धोनी किंवा विराटवर टीका करू नका, आशिष नेहरालाही त्यानं निवृत्ती कधी घ्यावी याची मुभा दिली होती. त्यामुळे धोनी - विराटवर टीका करणे चुकीचे ठरेल. हे सर्व क्रिकेटपटू मिडल क्लास कुटुंबातून आलेले आहेत आणि क्रिकेटनं त्यांना हिरो बनवलं आहे. त्यासाठी तुमचे, टिव्ही, सोशल मीडिया याचे आभार मानायला हवेत. तुमच्यासारख्या लोकांमुळेच भारतीय क्रिकेटपटू हिरो बनले आहेत.'' राहुल द्रविडच्या या उत्तरानं सभागृहात टाळ्या व शिट्या वाजू लागल्या.   IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; MIच्या सलामीवीरासोबत केला होता प्रवास

पाहा व्हिडीओ..

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Former India captain Rahul Dravid trolled the senior journalist Rajdeep Sardesai with a fitting reply, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.