माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात

गांगुली बुधवारी रात्रीही रुग्णालयात राहतील आणि त्यांच्यावर गुरुवारी अँजियोप्लास्टी होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 06:34 AM2021-01-28T06:34:47+5:302021-01-28T06:35:04+5:30

whatsapp join usJoin us
Former cricketer and BCCI president Sourav Ganguly is back in hospital | माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात

माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : छातीत दुखू लागल्याने पुन्हा एकदा भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर नुकताच अँजियोप्लास्टी करण्यात आली होती आणि यास एक महिनाही उलटलेला नाही. एका खासगी रुग्णालयात गांगुली यांच्या अनेक चाचण्या झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गांगुली बुधवारी रात्रीही रुग्णालयात राहतील आणि त्यांच्यावर गुरुवारी अँजियोप्लास्टी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Former cricketer and BCCI president Sourav Ganguly is back in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.