इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेला प्रसिद्ध कृष्णा पॉझिटिव्ह

इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात २५ वर्षांच्या प्रसिद्धला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:57 IST2021-05-09T03:59:22+5:302021-05-09T06:57:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Famous Krishna Positive selected for England tour | इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेला प्रसिद्ध कृष्णा पॉझिटिव्ह

इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेला प्रसिद्ध कृष्णा पॉझिटिव्ह

बंगळुरु : केकेआरचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे राहत्या घरी विलगीकरणात आहे.बीसीसीआयच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली.

इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात २५ वर्षांच्या प्रसिद्धला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले होते. कोरोनाबाधित झालेला केकेआरचा तो चौथा खेळाडू आहे. याआधी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टीम सीफर्ट यांना कोरोनाची लागण झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध आणि संदीप हे एका सराव सत्राच्यावेळी वरुणच्या संपर्कात आले होते.प्रसिद्ध आणि वरुण हे घनिष्ठ मित्र आहेत. सर्व खेळाडूंच्या चाचणीचे दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ३ मे रोजी बायोबबल सोले होते. बंगळुरु येथे दाखल झाल्यानंतर प्रसिद्ध पॉझिटिव्ह आढळला.२५ मे रोजी भारतीय संघ ब्रिटनकडे प्रस्थान करणार असून त्याआधी प्रसिद्ध कोरोनामुक्त होईल,अशी आशा बीसीसीआयने व्यक्त केली आहे.

टीम सीफर्टलाही लागण -
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक- फलंदाज तसेच केकेआरचा खेळाडू टीम सीफर्ट हा देखील पॉझिटिव्ह असून तो अहमदाबाद येथे इस्पितळात उपचार घेत आहे.त्यानंतर त्याच्यावर चेन्नईत उपचार होतील. रवाना होण्याआधी सीफर्टच्या दोन्ही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. सीफर्टमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. न्यूझीलंडचे अन्य खेळाडू ११ मे रोजी मायदेशी रवाना होणार आहेत, मात्र सीफर्ट सध्या येथेच वास्तव्य करेल. मागच्या दहा दिवसात त्याच्या सात चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी दिली.न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यानंतर सीफर्टला १४ दिवस विलगीकरणात वास्तव्य करावे लागेल,असेही व्हाईट यांनी सांगितले.

Web Title: Famous Krishna Positive selected for England tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.