ठळक मुद्दे बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी अर्धशतकी खेळी करताना विक्रमांनाही गवसणी घातली. बाबर आझम यानं विराट कोहली आणि अॅरोन फिंच यांच्या विक्रमाशी बरोबरी केली डीजे मलान आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांची तुफान फटकेबाजी
कसोटी मालिकेत शरणागती पत्करलेल्या पाकिस्तान संघाला ट्वेंटी-20 मालिकेतही अपयश आलेलं पाहायला मिळत आहे. पहिल्या ट्वेंटी-20त इंग्लंडच्या टॉम बँटनने पाक गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. पण, पावसामुळे हा सामना रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 195 धावा चोपल्या. बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी अर्धशतकी खेळी करताना विक्रमांनाही गवसणी घातली. ट्वेंटी-20त सर्वात जलद 1500 धावा करण्याचा विराट कोहली आणि अॅरोन फिंच यांच्या विक्रमाशी बाबर आझमनं बरोबरी केली, तर ट्वेंटी-20त 2000 धावा आणि 50 विकेट्स घेणारा हाफीज हा जगातील एकमेव खेळाडू ठरला. पण, त्यांच्या विक्रमी खेळीला पराभवाचा ठपका लागला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या बाबर आझम आणि फखर जमान यांनी पाकिस्तानला दमदार सुरूवात करून दिली. दोघांची 72 धावांची भागीदारी आदील रशीदनं संपुष्टात आणली. जमान 36 धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार आझम आणि 39 वर्षीय हाफीजनं दमदार खेळ केला. रशीदनं पुन्हा इंग्लंडला यश मिळवून दिले. आझमनं 44 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीनं 56 धावा केल्या. शोएब मलिक 14 धावा करून माघारी परतला. हाफीजनं 36 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 69 धावा केल्या. पाकिस्ताननं 20 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या.
एवढ्या धावा चोपल्यावर विजय पक्का, याच स्वप्नात पाकिस्तानी खेळाडू मैदानावर उतरले. पण, टॉम बँटन आणि जॉनी बेअरस्टो यांनी संयमी खेळ करताना इंग्लंडला अर्धशतकी सलामी दिली. बेअरस्टो 24 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 44 धावा केल्या. पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर बँटनही ( 20) माघारी परतला. पण, डीजे मलान आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी शतकी भागीदारी करताना पाकिस्तानी गोलंदाजांना बदड बदड बदडले.. मॉर्ननं 33 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून 66 धावा केल्या. मलाननं 36 चेंडूंत नाबाद 54 धावांची खेळी केली. त्यात 6 चौकार व 1 षटकाराचा समावेश आहे. इंग्लंडनं 5 बाद 199 धावा करून 5 चेंडू राखून हा सामना जिंकला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोट्याधीश महेंद्रसिंग धोनीकडे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे 1,800 रुपये थकीत!
हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप
किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!