England vs Pakistan 1st Test: पाकिस्तानचा खेळ खल्लास; इंग्लंडसमोर तगडं आव्हान उभारण्यास अपयश

England vs Pakistan 1st Test: यासीर शाहनं तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन पाकिस्तानला समाधानकारक पल्ला गाठून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 04:20 PM2020-08-08T16:20:50+5:302020-08-08T16:21:05+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan 1st Test: Jofra Archer takes the final wicket to bowl Pakistan out for 169. England are to chase 277 | England vs Pakistan 1st Test: पाकिस्तानचा खेळ खल्लास; इंग्लंडसमोर तगडं आव्हान उभारण्यास अपयश

England vs Pakistan 1st Test: पाकिस्तानचा खेळ खल्लास; इंग्लंडसमोर तगडं आव्हान उभारण्यास अपयश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Pakistan 1st Test: शान मसूदच्या ( 156) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघानं पहिल्या डावात 326 धावा उभ्या करून इंग्लंडसमोर आव्हान उभे केले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना इंग्लंडचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळून 107 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला वर्चस्व गाजवण्याची संधी होती, पंरतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना पाकिस्तानला धक्के दिले. तिसऱ्या दिवशी तब्बल 14 विकेट्स पडल्या, चौथ्या दिवशी पाकिस्तानच्या तळाच्या दोन विकेट्सनी 32 धावांची भर घातली. 

निंदनीय: 90 वर्षीय आईला कोरोना झाला म्हणून मुलानं तिला जंगलात सोडलं! 

Breaking : अभिषेक बच्चनचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; चाहत्यांचे मानले आभार

इंग्लंडकडून तिसऱ्या दिवशी ओली पॉप ( 62) आणि जोस बटलर ( 38) यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्टुअर्ट ब्रॉड ( 29*) साथ दिली, परंतु इंग्लंडला पहिल्या डावात 219 धावा करता आल्या. 107 धावांच्या आघाडीसह पुन्हा मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांना मात्र यावेळी साजेशी खेळी करता आली नाही. पहिल्या डावातील शतकवीर शान मसूद भोपळाही फोडू शकला नाही. स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स यांनी पाकिस्तानला धक्के दिले. त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 137 धावांत माघारी परतले आहे.  

स्टार फुटबॉलपटूनं पत्नीला सोडचिठ्ठी देऊन थाटला भाचीसोबत संसार!

यासीर शाहनं तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन पाकिस्तानला 169 धावांपर्यंत नेले. यासीरनं 33 धावा केल्या. पाकिस्तानचा दुसरा डाव 169 धावांत संपुष्टात आल्यानं इंग्लंडसमोर 277 धावांचे लक्ष्य आहे. स्टुअर्ट ब्रॉडनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर ख्रिस वोक्स व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


अन्य महत्त्वाच्या बातम्या

Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!

सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट

जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये

शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स  

बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...

दहा वर्षांच्या प्रेमानंतर अखेर टीम इंडियाचा क्रिकेटपटू चढला बोहोल्यावर!

Web Title: England vs Pakistan 1st Test: Jofra Archer takes the final wicket to bowl Pakistan out for 169. England are to chase 277

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.