ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

बेन स्टोक्स-रुट जोडी फोडली तर विजयाचा मार्ग होईल आणखी सोपा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 21:21 IST2025-06-24T21:20:06+5:302025-06-24T21:21:07+5:30

whatsapp join usJoin us
England vs India 1st Test Shardul Thakur Gets Two Wickets In Two Balls Ben Duckett Harry Brook | ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ENG vs IND Shardul Thakur Gets Two Wickets In Two Balls भारत-इंग्लंड यांच्यात लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील सामना अगदी रंगतदार स्थितीत पोहचला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे निर्धारित वेळेच्या आधी चहापानापर्यंत खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या बाजूनं झुकलेला सामना पुन्हा टीम इंडियाच्या बाजूनं वळला आहे. प्रसिद्ध कृष्णानं दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स मिळवल्यावर कॅप्टन शुबमन गिल याने चेंडू शार्दुल ठाकूरच्या हाती सोपवला अन् त्याने २ चेंडूत २ विकेट घेत टीम इंडियाला पुन्हा मॅचमध्ये आणले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शार्दुल ठाकूरची कमाल; २ चेंडूत २ विकेट्स घेत मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

इंग्लंडच्या डावातील ५५ व्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजीला आला. याआधी त्याने फक्त चार षटके टाकली होती. या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव टाकल्यावर शार्दुल ठाकूरनं बेन डकेटला बदली खेळाडूच्या रुपात मैदानात आलेल्या नितीश कुमार रेड्डी करवी झेला बाद केले. चौथ्या चेंडूवर हॅरी ब्रूकची विकेट घेत शार्दुल ठाकूरनं इंग्लंडच्या बाजूनं सेट झालेला सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला. बेन डकेट याने १७० चेंडूत २१ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४९ धावांची खेळी केली.

यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला

जोडी फोडली तर विजयाचा मार्ग होईल आणखी सोपा 

पावसाच्या व्यत्ययामुळे चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने ४ विकेट्सच्या मोबदल्यात २६९ धावा केल्या होत्या.  इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स १३ (१७) आणि जो रुट १४ (३१) धावांवर खेळत होते. इंग्लंडच्या संघाला विजयासाठी आणखी १०२ धावा करायच्या असून भारतीय संघाला ६ विकेट्स मिळवायच्या आहेत. बेन स्टोक्स अन् जो रुट जोडी फोडून भारतीय संघ विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Web Title: England vs India 1st Test Shardul Thakur Gets Two Wickets In Two Balls Ben Duckett Harry Brook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.