ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा

टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर भारी ठरली इंग्लंडची सलामी जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 20:46 IST2025-06-24T20:43:27+5:302025-06-24T20:46:08+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs IND Zak Crawley And Ollie Pope Fall In Back To Back Overs From Prasidh Krishna | ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा

ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs India, 1st Test  Day 1 : लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात यजमान इंग्लंडच्या सलामी जोडीनं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात केली. बेन डकेटच्या शतकी खेळीसह पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या झॅक क्रॉउलीनं अर्धशतक झळकावले. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ३५० धावांची गरज असताना या जोडीनं केलेली मोठी भागीदारी भारतीय संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाच शतकांना फिकी पाडण्यास कारणीभूत ठरू शकेल, अशी होती. अखेर इंग्लंडच्या डावातील ४३ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णानं ही जोडी फोडली. एवढेच नाही तर त्याने पहिल्या डावातील शतकवीरालाही स्वस्तात माघारी धाडले. या दोन विकेट्स भारतीय संघाला मोठा दिलासा देणाऱ्या अशाच होत्या.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

प्रसिद्ध कृष्णानं फोडली इंग्लंडची सलामी जोडी, या दोघांनी केली १८८ धावांची भागीदारी

झॅक क्राउली आणि बेन डकेट या जोडीनं बिन बाद २१ धावांवरून पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. ३७१ धावांचा पाठलाग करताना या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. झॅक क्रॉउली आणि बेन डकेट यांनी दुसऱ्या डावात १८८ धावांची दमदार भागीदारी रचली. डोकेदुखी ठरत असलेली ही जोडी प्रसिद्ध कृष्णानं फोडली. झॅक क्रॉउलीला त्याने केएल राहुलकरवी स्लीपमध्ये झेलबाद केले. पुढच्या षटकात ओली पोपच्या रुपात प्रसिद्ध कृष्णानं टीम इंडियााल आणखी एक यश मिळवून दिले. चो १२६ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाला.  पहिल्या डावातील शतकवीर ८ चेंडूत ८ धावा करून तंबूत परतला.

IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...

दोन विकेट्स मिळाल्या, पण...

भारतीय संघाला दोन विकेट्स मिळाल्या पण सामना अजूनही इंग्लंडच्या बाजूनं आहे. जर इंग्लंडला रोखायचं असेल तर सर्वात आधी बेन डकेटची विकेट मिळवावी लागेल. ही विकेट लवकरात लवकर मिळाली तर इंग्लंडच्या उर्वरित फलंदाजीला खिंडार पाडणे सोपे होईल. पण जर तो टिकला तर टीम इंडियाला हा सामना वाचवणेही मुश्किल होऊन बसेल. प्रसिद्ध कृष्णानं पहिल्या डावातही ३ विकेट्स घेतल्या. पण या डावात तो चांगलाच महागडा ठरला होता. दुसऱ्या डावात त्याने११ षटकात ६९ धावा खर्च करून २ विकेट्स घेत दमदार कमबॅक केले.

Web Title: ENG vs IND Zak Crawley And Ollie Pope Fall In Back To Back Overs From Prasidh Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.