ENG vs IND 2nd Test : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात शतकी खेळी करणाऱ्या शुबमन गिलनं दुसऱ्या दिवसाच्या खेळात द्विशतक झळकावले. तो त्रिशतकाच्या दिशनं वाटचाल करत असताना २६९ धावांवर झेलबाद झाला. गिलच्या त्रिशतकासह दुसऱ्या दिवसाच्या खेळात रवींद्र जडेजाचं शतक हुकलं तर वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी खेळी करण्याची संधी हुकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियानं रचला खास इतिहास
या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडच्या संघासमोर धावांचा डोंगर उभारला. एवढेच नाही तर टीम इंडियानं या सामन्यात सहाव्या आणि सातव्या विकेट्सच्या भागीदारीसह खास कामगिरीची नोंद केली. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात जे घडलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं. ही कामगिरी नोंदवताना रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरशिवाय शुबमन गिलनं सिंहाचा वाटा उचलला. एक नजर भारतीय संघाने केलेल्या खास ऐतिहासिक कामगिरीवर
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
शुबमन गिल-रवींद्र जडेजा जोडीची द्विशतकी भागीदारी
पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने २११ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रवींद्र जडेजानं कर्णधार शुबमन गिलच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी २०३ धावांची भागीदारी रचली. जडेजा ८९ धावांवर बाद झाला. सहाव्या विकेटसाठी भारतीय संघाकडून ही सर्वोच्च भागीदारीपैकी एक आहे. टीम इंडियाकडून कसोटीत सहाव्या विकेट्सच्या सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड हा रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसकर या जोडीच्या नावे आहे. १९८६ मध्य मुंबईतील वानखेडेच्या मैदानात या जोडीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९८ धावांची नाबाद भागीदारी रचली होती.
गिलला वॉशिंग्टन यानेही दिली 'सुंदर' साथ
रवींद्र जडेजाने कर्णधार शुबमन गिलसोबत केलेल्या द्विशतकी भागीदारीसह टीम इंडियाने ४०० धावसंख्येचा आकडा पार केला. त्यानंतर शुबमन गिल आणि वॉशिंग्टन जोडी जमली. वॉशिंग्टन सुंदर ४२ धावांवर बाद झाला. या जोडीनं सातव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी रचत टीम इंडियाची धावसंख्या ५०० पार नेली. यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाकडून सहाव्या आणि सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी पाहायला मिळाली. यात शुबमन गिलनं मोठा वाटा उचलला.
Web Title: ENG vs IND 2nd Test First Time In Test History Team India Recorded A Century Partnership For The 6th And 7th Wickets Shubman Gill Ravindra Jadeja Washington Sundar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.