मुंबई : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या भवितव्याचा निर्णय थोड्याच वेळात अपेक्षित आहे. कारण द्रविडवरील आरोपांची सुनावणी संपली आहे. त्यामुळे काहीच वेळात यावर निर्णय अपेक्षित आहे.
![Conflict Conundrum: Rahul Dravid Asked To Depose Before Ethics Officer On September 26 | राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून <a href='https://www.lokmat.com/topics/bcci/'>बीसीसीआयचे</a> फर्मान]()
बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीच्या अधिकाऱ्यांनी द्रविडला नोटीस बजावली होती. या नोटीशीमध्ये द्रविड परस्पर हितसंबंध जपत असल्याचे म्हटले गेले होते. या नाटीशीवर द्रविडला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानुसार द्रविडने आपली बाजू मांडली आहे. आता या प्रकरणावरील निर्णय लवकरच येऊ शकतो.
![Verdict to be out soon in Rahul Dravid]()
द्रविड हा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. पण दुसरीकडे द्रविड चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक असलेल्या एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट्स या कंपनीमध्ये उपाध्यक्ष आहे. त्यामुळे द्रविड परस्पर हितसंबंध जपत आहे, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.