DC vs KXIP Latest News : Shocking; आर अश्विनला गंभीर दुखापत? प्रचंड वेदनेसह सोडले मैदान

DC vs KXIP Latest News : दिल्लीसाठी खेळताना अश्विनने आपला माजी संघ किंग्ज ईलेव्हनविरुध्द पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. करुण नायरला त्याने पृथ्वीकरवी झेलबाद केले.

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2020 10:32 PM2020-09-20T22:32:21+5:302020-09-20T23:07:34+5:30

whatsapp join usJoin us
DC vs KXIP Latest News :  Ashwin has dislocated his shoulder, diving to save a run off his own bowling!  | DC vs KXIP Latest News : Shocking; आर अश्विनला गंभीर दुखापत? प्रचंड वेदनेसह सोडले मैदान

DC vs KXIP Latest News : Shocking; आर अश्विनला गंभीर दुखापत? प्रचंड वेदनेसह सोडले मैदान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसरा दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ( Dubai International Cricket Stadium ) खेळवला गेला.  मोहम्मद शमी ( Mohammed shami) ने सुरेख गोलंदाजी करून DCच्या धावांवर लगाम लावली. पण, मार्कन स्टॉयनिसने तुफान फटकेबाजी करून KXIPच्या गोलंदाजाना हतबल केले. ( IPL 2020 Live Updates, Click here)

लोकेश राहुलची आजच्या सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या 'Unique' विक्रमाशी बरोबरी 

KL Rahulनं झेल सोडला? पण, शिखर धवनचा 'पोपट' झाला, भोपळ्यावर माघारी परतला

शमीनं ( Mohammed Shami) टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शिखर धवनला भोपळाही न फोडता माघारी जावं लागलं. शमीनं चौथ्या षटकात DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिमरोन हेटमायर यांना माघारी पाठवले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या 3 बाद 23 धावा होत्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) ने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरला. पण, युवा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या रवी बिश्नोईनं  ( Ravi Bishnoi) ही सेट जोडी तोडली. त्यानं पंतला त्रिफळाचीत केले. 

KL Rahulने शमीला पुन्हा पाचारण केले आणि त्यानं त्याचा विश्वास सार्थ ठरवला. Shamiने अय्यरला बाद केले. शमीने षटकांत 15 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. IPLमधील त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी त्यानं 2019मध्ये MI विरुद्ध 21 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. पदार्पणवीर रवी बिश्नोईनंही 4 षटकांत 21 धावा देत 1 विकेट घेतली. त्यानंतर अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिसने ( Marcus Stoinis ) फटकेबाजी करून DCला समाधानकारक पल्ला गाठून दिला.  मार्कसनं 20 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 21 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 53 धावा केल्या. दिल्लीनं 20 षटकांत 8 बाद 157 धावा केल्या. 


आर अश्विननं ( Ashwin) KXIPला दिले धक्के, पण दुखापतीमुळे मैदान सोडले.
KL Rahul आणि मयांक अग्रवाल KXIPसाठी सलामीला आले. राहुलनं फटकेबाजी करून 21 धावा केल्या, परंतु मोहित शर्माच्या सुरेख चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आर अश्विननं ( Ashwin) एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले. निकोलस पुरनला सहजतेनं त्यानं त्रिफळाचीत केलं. करुण नायरही त्याच्या गोलंदाजीवर फसला. ग्लेन मॅक्सवेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु कागिसो रबाडानं त्याला बाद केले. अश्विनने सहाव्या षटकात KXIPला दोन धक्के दिले, परंतु अखेरच्या चेंडूवर एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतले. त्याच्या डाव्या खांद्याला ही दुखापत झाली असून त्याला प्रचंड वेदना होताना पाहायला मिळाल्या. त्यानं तसेच मैदान सोडले.

पाहा व्हिडीओ..

Read in English

Web Title: DC vs KXIP Latest News :  Ashwin has dislocated his shoulder, diving to save a run off his own bowling! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.