महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा!

रांचीतून आलेला माही पहिल्या चार सामन्यांत केवळ ( ०, १२, ७* व ३) २२ धावाच करू शकला होता. अशात त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत संधी मिळेल की नाही, याचीही हमी नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:24 PM2021-04-05T16:24:34+5:302021-04-05T16:25:19+5:30

whatsapp join usJoin us
On this day in 2005: MS Dhoni scored his first international century, he score 148 against Pakistan | महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा!

महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

१६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) जगाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले होते. यष्टिरक्षक-फलंदाज या जागेसाठी टीम इंडियात तेव्हाची प्रचंड चुरस होती. त्यात रांचीतून आलेला माही पहिल्या चार सामन्यांत केवळ ( ०, १२, ७* व ३) २२ धावाच करू शकला होता. अशात त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत संधी मिळेल की नाही, याचीही हमी नव्हती. मालिकेतील पहिल्या सामन्यात ३ धावांवर बाद झाल्यानंतर पत्ता कट, असेच धोनीला वाटत होते. पण, त्याला सौरव गांगुलीनं संधी दिली अन् आता नाही तर कधीच नाही, या निर्धारानं तो मैदानावर उतरला. गांगुलीनं त्या सामन्यात धोनीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले आणि धोनीनं हा विश्वास सार्थ ठरवत पाकिस्तानी गोलंदाजांचा पालापाचोळा केला.मोहम्मद सिराजच्या घरी पोहोचली 'Mahindra Thar'; आनंद महिंद्रा म्हणतात, तुझ्या कर्तृत्वसमोर ही भेट काहीच नाही  

५ एप्रिल २००५... विशाखापट्टणमचं मैदान कट्टर प्रतिस्पर्धींच्या सामन्यासाठी सज्ज होते. सचिन तेंडुलकर ( २) चौथ्या षटकात धावबाद झाला अन् गांगुलीनं तिसऱ्या क्रमांकावर धोनीला पाठवले. वीरेंद्र सेहवाग आणि धोनी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. वीरूनं ४० चेंडूंत १२ चौकार व २ षटकार खेचून ७४ धावा चोपल्या. वीरूसोबतची ती भागीदारी धोनीचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी महत्त्वाची ठरली आणि त्यानंतर त्या संपूर्ण सामन्यात धोनीचाच जलवा पाहायला मिळाला. IPL 2021 : राज्यात कडक निर्बंध; आयपीएलच्या सामन्यांना महाराष्ट्र सरकारनं दिली परवानगी, पण...

१४व्या षटकात वीरू बाद झाल्यानंतर धोनीला राहुल द्रविडची साथ मिळाली. कर्णधार सौरव गांगुली (९) लगेच माघारी परतला अन् धोनी-द्रविडनं १४९ धावांची भागीदारी करून संघाला ९ बाद ३५६ धावांचा डोंगर उभा करून दिला.  धोनीनं १२३ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १४८ धावा चोपल्या. द्रविडनेही ५९ चेंडूंत ५२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २९८ धावांवर गडगडला. आशिष नेहरानं ४ आणि युवराज सिंगनं ३ विकेट्स घेतल्या

धोनीनं ३५० वन डे सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आणि श्रीलंकेविरुद्धची १८३ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. कर्णधार म्हणून वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा पहिलाच खेळाडू आहे. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १० शतकं व ७३ अर्धशतकांसह १०७७३ धावा आहेत.

Web Title: On this day in 2005: MS Dhoni scored his first international century, he score 148 against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.