नागपूर : या सामन्यासाठी अनेकांना तिकीटे मिळाली नाही. दुसरीकडे ४४,९०० इतकी प्रेक्षकक्षमता असलेल्या स्टेडिडयममधील अनेक खुर्च्या मात्र रिकाम्या होत्या. तिकीट विक्री हाऊसफुल झाल्यानंतरही प्रेक्षकांनी मैदानावर हजेरी का लावली नसावी, अशी चर्चा रंगली.
यासंदर्भात व्हीसीएच्या सूत्रांनी सांगितले की, ‘आमच्याकडील सर्व तिकीटे आॅन लाईन विक्रीसाठी उपलब्ध होती. ७ नोव्हेंबरला सकाळी तिकीटविक्रीस प्रारंभ झाल्यानंतर अवघ्या काही तासात उपलब्ध तिकीटे संपली. ज्यांना तिकीटे आॅन लाईन कशी बुक करायची हे कळते त्यांचे फावले, पण ज्यांना कळले नाही, त्यांना इतकांकडे विचारणा करण्याशिवाय पर्याय नव्हता.’
>अन् तो रावणाच्या वेशभूषेत अवतरला
सर्वोच्या न्यायालयाने शनिवारी अयोध्येचा निकाल देत राममंदिर उभारणीचे आदेश दिल्यामुळे देशात उत्साहाचे वातावरण आहे. नागपुरातील क्रिकेट चाहतेही उत्साहात दिसले. तथापि आशिष लेंडे नावाच्या चाहत्याने रावणाच्या वेशभूषेत मैदानावर हजेरी लावली. त्यामुळे चाहत्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे लावून त्याच्यासोबत सेल्फी काढून घेत हस्तांदोलन केले.
हेल्मेट, बॅग स्टॅण्डवर लूट
बॅग व हेल्मेट आत नेण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याने चाहत्यांना त्रास झाला. याचा फायदा घेत स्थानिकांनी हेल्मेट आणि बॅग स्टॅण्ड लावून बरेच पैसे उकळले. हेल्मेट व बॅगसाठी प्रत्येकी शंभर रुपये शुल्क आकारण्यात आले.
>युझवेंद्र चहलची ‘स्पेशल फिफ्टी’ : भारतीय गोलंदाजीचा ‘कणा’ मानला जाणारा फिरकीपटू युझवेंद्र चहलने टी२० क्रिकेटमध्ये ५० बळी पूर्ण केले. मालिका सुरू होण्यापूर्वी ‘स्पेशल फिफ्टी’ पासून तो ४ बळी दूर होता. याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू आर. अश्विन यांनी भारताकडून ही ‘स्पेशल’ कामगिरी केली आहे. चहलने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चहलच्या नावावर ३४ सामन्यांत ५० बळींची नोंद झाली.
>टर्निंग पॉर्इंट......
सलामीवीर मोहम्मद नईमने
१६ व्या षटकापर्यंत खेळून
१० चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ८१ धावांचा झंझावात केला.
शिवम दुबेने त्याला यॉर्करवर त्रिफळाबाद केले. पुढच्या चेंडूवर आफिफ हुसेन याला बाद करताच भारताच्या बाजूने सामना फिरला. मिथूनसोबत (२७) तिसऱ्या गड्यासाठी ९८
धावांची भागीदारी करणारा नईम खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशने सामन्यावर पकड राखली होती.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकात ५ बाद १७४ धावा (श्रेयस अय्यर
६२, लोकेश राहुल ५२; सौम्य सरकार २/२९, शफिउल इस्लाम २/३२.) वि.वि. बांगलादेश : १९.२ षटकात सर्वबाद १४४ धावा. (मोहम्मद नईम ८१, मोहम्मद मिथुन २७; दीपक चाहर ६/७, शिवम दुबे ३/३०.)
रिषभ पंत
पुन्हा ‘फ्लॉप’
रिषभ पंत पुन्हा एकदा फ्लॉप झाला. धावसंख्येला आकार देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, पण तो
२२ मिनिटे खेळपट्टीवर राहूनही ९ चेंडूत
६ धावा काढू शकला.
सौम्या सरकाने त्याचा त्रिफळा उडवला.
रोहितकडून निराशा, चाहते सुन्न
षटकार ठोकण्यासाठी
मजबूत शरीरयष्टी नव्हे, तर अचूक टायमिंग साधता
आले ंपाहिजे, असे सांगणारा रोहित फ्लॉप ठरला. दुसºया षटकात शफीऊल इस्लामने तिसºया चेंडूवर रोहितची दांडी गूल केली.