वाईट बातमी; अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 11:23 IST2020-05-21T11:19:35+5:302020-05-21T11:23:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Cricketer Ajinkya Rahane Maternal Uncle Dies in Sangamner svg | वाईट बातमी; अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

वाईट बातमी; अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजिंक्य रहाणेचे मामा राजेंद्र राधाकृष्ण गायकवाड यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  राजेंद्र गायकवाड यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावात मंगळवारी सायंकाळी 4.30  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  गायकवाड दुपारी आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेले असताना त्यांचा पाय घसरला. बराच वेळ होऊनही ते घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना संशय म्हणून एकाने विहिरीत डोकावून पाहिले गायकवाडही विहिरीत पडलेले दिसले.

गावकरी आणि नातेवाईकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. बुधवारी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.  

हरभजन सिंग मागतोय सचिन तेंडुलकरकडे लिंबू, Video पाहून तुम्हालाही कळेल कारण

Shocking : WWE सुपरस्टारचा बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवण्यासाठी केला त्याग!

Read in English

Web Title: Cricketer Ajinkya Rahane Maternal Uncle Dies in Sangamner svg