Chris Lynn hammers 20 sixes, scores 140 of his 154 runs in boundaries in Queensland Premier T20, Watch Video | IPL 2020त मुंबई इंडियन्सनं संधी न दिलेल्या ऑसी फलंदाजानं ५५ चेंडूंत खेचले २० षटकार अन् १५४ धावा, Video

IPL 2020त मुंबई इंडियन्सनं संधी न दिलेल्या ऑसी फलंदाजानं ५५ चेंडूंत खेचले २० षटकार अन् १५४ धावा, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) जेतेपद पटकावलं. पण, मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या पूर्ण मोसमात ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिनला ( Chris Lynn) एकदाही प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिलेली नाही. आयपीएल संपल्यानंतर तीन आठवड्यानंतर लिननं त्याच्या फॅन्सला आनंदीत केले. त्यानं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या क्विन्सलँड प्रीमिअर ट्वेंटी-20 लीगच्या सामन्यात ५५ चेंडूंत १५४ धावा चोपल्या. त्यानं या खेळीदरम्यान २० षटकार खेचले. 

लिननं या सामन्यात धावांची त्सुनामीच आणली. त्यानं १५४ पैकी १२० धावा या केवळ षटकार व चौकारांनी केल्या. त्यानं अखेरच्या ३४ चेंडूंत ११५ धावा केल्या आणि शतक पूर्ण करण्यासाठी त्यानं ३८ चेंडूंचा सामना केला. 


पाहा व्हिडीओ...

लिनच्या या खेळीच्या जोरावर टूमबूल संघानं ६ बाद २२६ धावा केल्या. ३० वर्षीय लिनचा बिग बॅश लीगमध्येही दबदबा आहे. BBLच्या इतिहासात सर्वाधिक २३३२ धावांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.  

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Chris Lynn hammers 20 sixes, scores 140 of his 154 runs in boundaries in Queensland Premier T20, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.