मुंबई : वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल हा धडाकेबाज फलंदाज म्णून ओळखला जातो. पण आता Tik Tokवर पदार्पण करताच ख्रिस गेलची तुफानी बॅटींग पाहायला मिळाली आहे. गेलचे Tik Tokवरील व्हिडीओ चांगलेच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला Tik Tokवरील व्हिडीओ चांगलेच हिट होताना दिसत आहेत. त्यामुळे गेलने Tik Tokवरील व्हिडीओ करण्यात रस दाखवला आहे. सध्याच्या घडीला गेलचे ५ लाख ९० हजार फॉलोअर्स आहेत, आतापर्यंत जवळपास तीन मिलयन लाइक्स त्याच्या व्हिडीओला मिळाले आहेत.

Tik Tokवरील व्हिडीओमध्ये गेल ग्रे रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. त्याबरोबर यामध्ये त्याने आपला अॅटीट्युड दाखवल्याचेही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये गेलने बऱ्याच वेगवेगळ्या स्टाइल दाखवल्या आहेत. त्यामुळे गेलचे हे व्हिडीओ प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.
