Chinese Rocket In Maldives: चीनचं भरकटलेलं रॉकेट कोसळलं अन् डेव्हिड वॉर्नरची उडाली झोप; पहाटे ५ वाजता खडबडून जागा झाला, Video

गेल्या काही दिवसांपासून जगाला चिंता लागून राहिलेल्या चिनी रॉकेटचे अवशेष अखेरीस हिंदी महासागरात मालदीवजवळ कोसळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:42 PM2021-05-11T14:42:34+5:302021-05-11T14:43:02+5:30

whatsapp join usJoin us
Chinese Rocket In Maldives Explosion 'Rattles' David Warner, Other Foreign IPL Players, Watch Video | Chinese Rocket In Maldives: चीनचं भरकटलेलं रॉकेट कोसळलं अन् डेव्हिड वॉर्नरची उडाली झोप; पहाटे ५ वाजता खडबडून जागा झाला, Video

Chinese Rocket In Maldives: चीनचं भरकटलेलं रॉकेट कोसळलं अन् डेव्हिड वॉर्नरची उडाली झोप; पहाटे ५ वाजता खडबडून जागा झाला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गेल्या काही दिवसांपासून जगाला चिंता लागून राहिलेल्या चिनी रॉकेटचे अवशेष अखेरीस हिंदी महासागरात मालदीवजवळ कोसळले. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे चिनी तसेच अमेरिकी अवकाश संस्थांनी स्पष्ट केले आहे. अंतराळात भरकटलेल्या चिनी रॉकेटला जलसमाधी मिळाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला, परंतु या रॉकेटनं ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याची झोप उडवली. IPL 2021स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवमध्ये दाखल झाले आहेत. चिनी रॉकेट हे नेमकं मालदीवजवळ कोसळले. 

वॉर्नरनं दी ऑस्ट्रेलियनशी बोलताना सांगितले की, ''रॉकेट कोसळल्यानंतर जोरदार धमाका झाला अन् मी पहाटे ५.३० वाजता खडबडून जागा झालो. वायुमंडलात भेगा पडल्यानं हा आवाज आल्याचे जाणकारांनी सांगितले, याचा रॉकेट कोसळण्याशी काही संबंध नाही.'' वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, स्टाफ आणि अम्पायर्स असे ३७ जणं मालदीवमध्ये क्वारंटाईनमध्ये आहेत. 

पाहा व्हिडीओ...
 

 नेमके प्रकरण काय - 
- ‘लाँग मार्च ५बी’ नावाचे रॉकेट २९ एप्रिल रोजी चीनच्या हैनान प्रांतातून अवकाशात झेपावले.
- त्यात ‘तिआन्ह’ हे मॉड्युल स्थापित करण्यात आले होते. चीनच्या अवकाश स्थानकासाठी ते महत्त्वाचे होते. 
- मिशन पूर्ण झाल्यावर ‘लाँग मार्च ५बी’ अनियंत्रित झाले.
- चिनी अवकाश संस्थेचा ‘लाँग मार्च ५बी’शी संपर्क तुटला.
- हे दिशाहीन रॉकेट अंतराळात भरकटले. त्यानंतर त्याचे अवशेष पृथ्वीच्या दिशेने खेचले जाऊ लागले.
- रॉकेट उंची १८६ फूट आणि वजन २३ टन एवढे होते.

सगळ्यांनीच सोडला सुटकेचा नि:श्वास 
- अवकाशात भरकटलेले ‘लाँग मार्च ५बी’नेमके कुठे पडणार यावर अमेरिकेसह युरोपीय देशांच्या अवकाश संशोधन संस्थांचा काथ्याकूट सुरू होता.
- रॉकेटचे अवशेष प्रशांत महासागर परिसरात कोसळतील असा प्राथमिक अंदाज होता.  परंतु रविवारी पहाटेच्या सुमारास हिंदी महासागरात मालदीवच्या उत्तरेकडे हे अवशेष कोसळल्याचे चीनने जाहीर केले.
- रॉकेटचे बहुतांश भाग पृथ्वीच्या वातावरणात शिरताच घर्षणाने जळून गेले व उर्वरित अवशेष हिंदी महासागर परिसरात कोसळले, असे चिनी माध्यमांनी म्हटले आहे.
- अमेरिकी संरक्षण मंत्रालयाच्या स्पेस कमांडनेही हिंदी महासागरात कोसळण्यापूर्वी रॉकेटचे हे अवशेष सौदी अरेबियाच्या अवकाशात होते, असे म्हटले आहे.
 

Web Title: Chinese Rocket In Maldives Explosion 'Rattles' David Warner, Other Foreign IPL Players, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.