भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. वडोदराच्या मैदानात पहिल्या वनडे सामन्यासाठी कसून सराव करतानाचे किंग कोहलीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात आता आणखी एका खास फोटोची भर पडली आहे. वडोदऱ्याच्या मैदानात किंग कोहली चाहत्या बच्चे कंपनीला भेटला. त्याच्या भेटीला आलेल्या गटातील एका मुलाची छबी हुबेहुब ही लहानपणीच्या विराट कोहलीची आठवण करून देणारी होती. त्यामुळेच हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वडोदऱ्यात किंग कोहलीला भेटला 'चिकू', अन् ...
जो फोटो व्हायरल होत आहे त्यात काही मुले टीम इंडियाच्या जर्सीत विराट कोहलीच्या अवती भोवती गराडा घालून उभी आहेत. किंग कोहली या मुलांना हसतमुख चेहऱ्याने गप्पा गोष्टी करत स्वाक्षरी देताना दिसून येते. यातील एका मुलाची चेहरापट्टी ही लहानपणी विराट कोहली जसा दिसायचा तशीच आहे. त्यामुळे हा फोटो पाहिल्यावर वडोदऱ्यात कोहलीला 'चिकू' भेटला अशा आशयाचा मोहाल निर्माण झाला आहे. सध्याच्या घडीला फिटनेसच्या बाबतीत किंग असलेला विराट कोहलीला लहानपणी गुबगुबीत गाल आणि गोल चेहरा पाहून त्याचे दिल्लीतील कोच अजित चौधरी यांनी चिकू असं नाव पाडलं होते. त्याची कार्बन कॉपीत विराटसमोर उभी राहिल्याचे चित्र व्हायरल फोटोमध्ये पाहायला मिळते.
'विराट' दूरावा संपला! ज्या गोष्टीपासून लांब राहिला, तिकडे पुन्हा वळला किंग कोहली; ‘यू टर्न’ चर्चेत
आधी रोहितचा ड्युप्लिकेट अन् आता विराट कोहलीच्या बालपणीची छबी
न्यूझीलंडच्या वनडेआधी विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. कमालीचा योगायोग म्हणजे या मालिकेआधी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघात रोहित शर्माची कार्बन कॉपी चर्चेचा विषय ठरली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी विराट कोहलीसमोर त्याच्या बालपणीचा 'चिकू' असा कल्पनेपलिकडील क्षण अनुभवायला मिळाला.