कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडू सोशल मीडियावर अधिक सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. बुधवारी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. त्यात बालपणीच्या सचिन तेंडुलकरसह आणखी एक मुलगा तसाच दिसत आहे. महान फलंदाज तेंडुलकरनंच हा फोटो शेअर केला आहे आणि त्यानंतर तेंडुलकसोबत दिसणारा फोटो कोणाचा आहे, याचा शोध सुरू झाला.
वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याचा तो मुलगा आहे. लारानं सोशल मीडियावर त्याच्या मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तेंडुलकरनं लाराच्या मुलाच्या फोटोसह स्वतःचा बालपणीचा फोटो पोस्ट केला. त्यानं लिहिलं,''ब्रायन लारा, मी अशाच एका मुलाला ओळखतो की ज्याची फलंदाजी करण्याची शैली समान होती आणि त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.''
सचिन आणि लारा हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज होते. त्यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचे कोट्यवधी चाहते होते आणि एकहाती ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हैराण करून सोडायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 15921, तर वन डेत 18426 धावा केल्या आहेत. लारानंही कसोटी आणि वन डे या दोनही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी 10 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.
सचिनच्या नावावर सर्वाधिक 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम आहे. लारानं दुसरीकडे कसोटी क्रिकेटमध्ये 2004मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 400 धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती.
Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन
IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव
MS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय