BREAKING NEWS: VIVO won’t be the IPL sponsor this year, The IPL will have a new sponsor this edition IPL | Breaking News : Vivoने IPLसोबतचा करार मोडला; BCCIला शोधावा लागेल नवा स्पॉन्सर

Breaking News : Vivoने IPLसोबतचा करार मोडला; BCCIला शोधावा लागेल नवा स्पॉन्सर

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) होणार असल्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद संचारलं आहे, परंतु त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्यांच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे. गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण, त्याचवेळी त्यांनी Vivo हे टायटल स्पॉन्सर असतील, अशी केलेली घोषणा अनेकांना न पटणारी होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आयपीएलवर बहिष्कार घाला, चिनी कंपनी Vivoवर बहिष्कार घाला असा ट्रेंड सुरू होता. पण, आता Vivo आयपीएलसोबतचा करार  मोडला आहे. 

...तर 69 वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्त व्हायला सांगाल का?; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सवाल

पण, अजूनही बीसीसीआय आणि Vivo यांच्यापैकी कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही.  Vivo ही चिनी कंपनी आहे आणि मागील 48 तासांत सोशल मीडियावर IPL आणि Vivo यांना ट्रोल केले जात आहे. भारत-चीन सिमेवरील वाढत्या तणावामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा अशी मागणी जोर धरताना बीसीसीआयनं Vivoशी करार कायम ठेवल्यानं जोरदार टीका झाली. भारत सरकारनं चिनी अॅपवर बंदी घातली आहे. बीसीसीआयनं आता हा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. 

Vivo India ने 2017मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसात आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. यापूर्वी पेप्सिको ही आयपीएलची टायटल स्पॉन्सर होते आणि त्यांनी 2016मध्ये 396 कोटी रुपये दिले होते. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत. ''बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावर्षी Vivo टायटल स्पॉन्सर नसल्याची शक्यता अधिक आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मॅट फिशरच्या 'यॉर्कर'समोर फलंदाजानं घातलं लोटांगण; पाहा भन्नाट व्हिडीओ

MS Dhoniनं स्पष्टच सांगितले, 2019च्या वर्ल्ड कप संघासाठी तुझा विचार केला जाणार नाही; युवराज सिंगचा खुलासा 

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर रायफलधारी रणरागिणी?; व्हिडीओ व्हायरल

देशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र!

मोठी बातमी; मोदी सरकारचा चीनला दणका; दोन फेमस चिनी अ‍ॅप हटवण्याचे Play Store ला आदेश

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BREAKING NEWS: VIVO won’t be the IPL sponsor this year, The IPL will have a new sponsor this edition IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.