टीम इंडियाचा 'जंटलमन' भाजपात जाणार? जेपी नड्डांनी घेतली भेट

निवडणुक आयोगानं शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हरयाणा आणि महाराष्ट्र राज्यांसह कर्नाटकातील पोट निडवणुकाच्या तारखा जाहीर केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:43 PM2019-09-22T16:43:00+5:302019-09-22T16:43:34+5:30

whatsapp join usJoin us
BJP Working President JP Nadda meets veteran cricketer Rahul Dravid at latter's residence in Bengaluru | टीम इंडियाचा 'जंटलमन' भाजपात जाणार? जेपी नड्डांनी घेतली भेट

टीम इंडियाचा 'जंटलमन' भाजपात जाणार? जेपी नड्डांनी घेतली भेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू : निवडणुक आयोगानं शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हरयाणा आणि महाराष्ट्र राज्यांसह कर्नाटकातील पोट निडवणुकाच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं सत्तेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. भाजपात सध्या Incoming जोरात सुरू आहे. नेतेमंडळींप्रमाणे क्रिकेटपटू, बॉलिवूडमधील अनेक व्यक्तीही राजकारणात सक्रिय झालेल्याचा इतिहास आहे. पण, आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांनी अनेक सेलिब्रेटींच्या भेटी घेण्यास सुरूवात केली आहे. पण, कर्नाटकात झालेल्या एका भेटीमुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियातील जंटलमन भाजपाच्या वाटेवर जातो की काय, असा तर्क लावला जात आहे.

यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी झारखंड दौऱ्यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली होती आणि तेव्हाही अशाच चर्चा रंगल्या होत्या. रविवारी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बंगळुरू येथे जंटलमन, दी वॉल राहुल द्रविडची भेट घेतली आहे. त्यामुळे आता द्रविड भाजपात प्रवेश करतो की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. 

राहुल द्रविड सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या राष्ट्रीय अकादमीचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या 19 वर्षांखालील संघाने वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. द्रविडनं 164 कसोटींत 13288 धावा केल्या आहेत. त्यात 36 शतकं व 63 अर्धशतकांचा समावेश आहे. 344 वन डे सामन्यात त्याच्या नावावर 12 शतकं आणि 83 अर्धशतकांसह 10889 धावा आहेत. 

भाजपाच्या  राष्ट्रीय एकता मोहिमेंतर्गत रविवारी जेपी नड्डा आणि राष्ट्रीय महासचिव मुरलीधर राव यांनी बंगळुरु येथील द्रविडच्या निवासस्थानी भेट घेतली. 


राव म्हणाले, '' प्रतिभावान आणि दी वॉलच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविडची आम्ही भेट घेतली. राष्ट्रीय एकत मोहिमेंतर्गत ही भेट होती. यावेळी द्रविड यांना आम्ही जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा फायदा सांगितला. याशिवाय अनेक मुद्दे समजावून सांगितले.'' 

Web Title: BJP Working President JP Nadda meets veteran cricketer Rahul Dravid at latter's residence in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.