मोठी घोषणा : पृथ्वी शॉसह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला इंग्लंडचे बोलावणे आले; भारतीय संघात मोठे बदल झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 01:07 PM2021-07-26T13:07:29+5:302021-07-26T13:09:21+5:30

India Tour of England : शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.

BCCI has confirmed Prithvi Shaw and Suryakumar Yadav will be flying to England as replacements in the Test series | मोठी घोषणा : पृथ्वी शॉसह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला इंग्लंडचे बोलावणे आले; भारतीय संघात मोठे बदल झाले

मोठी घोषणा : पृथ्वी शॉसह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला इंग्लंडचे बोलावणे आले; भारतीय संघात मोठे बदल झाले

Next

India Tour of England : शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला हा मोठा धक्का होता. त्यामुळे बीसीसीआयनं निवड समितीला पर्यायी खेळाडू पाठवण्याचा विचार करावा असे सांगितले होते आणि त्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. 

अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला उजव्या हाताच्या बोटाच्या दुखापतीवर इंजेक्शन घ्यावे लागले आणि त्याची दुखापत लवकर बरी होईल, याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यानेही इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्याचे बीसीसीआयनं जाहीर केले आहे. कौंटी एकादश विरुद्ध टीम इंडिया यांच्यातल्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी आवेश खानच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याच्या बोटाला फॅक्चर असल्यामुळे तोही इंग्लंड दौऱ्यावरून माघारी परतणार आहे.  सलामीवीर शुबमन गिल मायदेशात परतला आहे.

यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं तोही संघासोबत सरावाला लागला आहे. गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, यष्टिरक्षक वृद्धीमान सहा आणि अभिमन्यू इस्वरन यांनीही विलगिकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. तेही संघासोबत सरावात सहभागी झाले आहेत. ( Bowling coach B. Arun, Wriddhiman Saha and Abhimanyu Easwaran have completed their self-isolation in London and have now joined Team India in Durham)

या तीन खेळाडूंना पर्याय म्हणून बीसीसीआयनं पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असलेल्या अभिमन्यूचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.  ( The All-India Senior Selection Committee has named Prithvi Shaw and Suryakumar Yadav as replacements.) 


भारतीय संघ - रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मह सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव. (India’s squad: Rohit Sharma, Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Virat Kohli (Captain), Ajinkya Rahane (vice-captain), Hanuma Vihari, Rishabh Pant (wicket-keeper), R. Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Jasprit Bumrah, Ishant Sharma, Mohd. Shami, Md. Siraj, Shardul Thakur, Umesh Yadav, KL Rahul, Wriddhiman Saha (wicket-keeper), Abhimanyu Easwaran, Prithvi Shaw, Suryakumar Yadav)
राखीव खेळाडू - प्रसिद्ध कृष्णा व अर्झान नगवासवाला ( Standby players: Prasidh Krishna, Arzan Nagwaswalla)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BCCI has confirmed Prithvi Shaw and Suryakumar Yadav will be flying to England as replacements in the Test series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app