BCCI Given Shubman Gill Medical Update : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहटीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. यासामन्यात कर्णधार शुभमन गिल खेळणार की नाही, यासंदर्भातील प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. कोलकाता येईल ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मानेच्या दुखापतीमुळे तो मैदानात उतरू शकला नव्हता. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरुन शुभमन गिलसंदर्भात मेडिकल अपडेट दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुभमन गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार
बीसीसीआयने एक्स अकाउंटवरुन दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मानेला दुखापत झाली. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर त्याला तात्काळ तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.वैद्यकीय उपचारांना शुभमन चांगला प्रतिसाद देत आहे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तो संघासोबत गुवाहाटीला रवाना होईल.
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
तो संघासोबत असला तरी खेळण्यासंदर्भात संभ्रम कायम
शुभमनच्या प्रकृतीवर BCCI ची वैद्यकीय टीम सतत लक्ष ठेवणार आहे. दुसऱ्या कसोटीत तो खेळू शकेल की नाही, याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असा उल्लेखही बीसीसीआयने ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे शुभमन गिल संघासोबत गुवाहटीला जाणार हे स्पष्टपणे सांगितले असले तरी दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार की नाही, यासंदर्भातील संभ्रम मात्र कायम आहे.
गिलच्या दुखापतीचा टीम इंडियाला बसला मोठा फटका
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आला. घरच्या मैदानातील सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. या सामन्यातील पहिल्या डावात शुभमन गिलवर ३ चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट होण्याची वेळ आली होती. मानेच्या दुखापतीमुळे मैदान सोडल्यावर दुसऱ्या डावातही त्याने बॅटिंग केली नाही. शुभमन गिलची दुखापत टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. कारण ३० धावांची अल्प आघाडी मिळवल्यावर भारतीय संघाने कोलकाता कसोटीत ३० धावांनी सामना गमावल्याचे पाहायला मिळाले. शुभमन गिल दुखापतीमुळे संघाबाहे गेल्यामुळे दोन्ही डावात ९ विकेट्स पडल्यावर भारताचा डाव आटोपला. हा मॅचचा सर्वात मोठा टर्निंग पाँइंटच ठरला. आता मालिका बरोबरी राखण्याचे आव्हान असताना गिल खेळणार का? तो खेळला नाही तर त्याची जागा कोण घेणार? या प्रश्नाच उत्तर टीम इंडियाला कुणाच्या रुपात मिळणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.