भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोविड काळात आतापर्यंत ६२० कोटींचा तोटा झाला आहे.

By मोरेश्वर येरम | Published: November 26, 2020 05:51 PM2020-11-26T17:51:19+5:302020-11-26T18:05:55+5:30

whatsapp join usJoin us
Australian Cricket Board expects Rs 1,560 crore from India tour | भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा

भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसिडनीत एकूण क्षमतेपैकी अर्ध्या तिकीटांची विक्रीसोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करुन सामना पाहता येणारकोरोनामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं आर्थिक गणित बिघडलं

सिडनी
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला भारतीय संघाच्या दौऱ्यातून कमाईची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोविड काळात मोठा तोटा झाल्याची माहिती दिली. पण भारत दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलियन बोर्डाचा आर्थिक गाडा रुळावर येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. 

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोविड काळात आतापर्यंत ६२० कोटींचा तोटा झाला आहे. २०२१ पर्यंत हा आकडा ८९० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून ऑस्ट्रेलियात कोणताही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकलेला नाही. त्यामुळे बोर्डाचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलं आहे. यातून उभारी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला भारतीय संघाचा दौरा खूप मोठी मदत करणारा ठरणार आहे. 

एडिंग्ज यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड अनेक आव्हानांचा सामना करत आहे. त्यामुळे आता भारत दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. क्रिकेट अभ्यासकांच्या अंदाजानुसार टीम इंडियाच्या दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला १५६० कोटी रुपयांची कमाई मिळू शकते. 

दक्षिण ऑस्ट्रेलियात होणार पहिली कसोटी
दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने नुकतंच आपल्या वार्षिक अहवालात ३ मिलिअन डॉलरचा (जवळपास २२ कोटी रुपये) तोटा झाल्याचं नमूद केलं होतं. अॅडलेट कसोटीतून क्रिकेट असोसिएशनला कमाईची अपेक्षा आहे. त्यामुळे अॅडलेड कसोटी रद्द होऊ न देण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियन प्रशासनासमोर आहे. 

सिडनीत होतेय तिकीट विक्री
भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. सिडनीतील स्टेडियमच्या संपूर्ण क्षमतेपैकी अर्ध्या क्षमतेपर्यंत तिकीट विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. स्टेडियममध्ये एक आसन सोडून प्रेक्षकांना बसावं लागणार आहे. 

Web Title: Australian Cricket Board expects Rs 1,560 crore from India tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.