ICC Women's T20 World Cup, Semi-Final: ऑस्ट्रेलियाने 20 षटकं खेळली, पण पावसाने पुन्हा कोंडी केली

ICC Women's T20 World Cup, Semi-Final: ऑस्ट्रेलियानं 20 षटकं खेळून काढल्यानंतर पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे ऑसींची कोंडी झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 03:56 PM2020-03-05T15:56:13+5:302020-03-05T15:58:46+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs South Africa ICC Women's T20 World Cup, Semi-Final: South Africa have kept Australia to 134/5, Unfortunately the rain has returned mac | ICC Women's T20 World Cup, Semi-Final: ऑस्ट्रेलियाने 20 षटकं खेळली, पण पावसाने पुन्हा कोंडी केली

ICC Women's T20 World Cup, Semi-Final: ऑस्ट्रेलियाने 20 षटकं खेळली, पण पावसाने पुन्हा कोंडी केली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's T20 World Cup, Semi-Final: भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. गटातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंडला बसलेल्या या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोटातही तशीच धाकधुक होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीचा सामन्यातही पावसानं खोडा घातला असता तर ऑस्ट्रेलियालाही गाशा गुंडाळावा लागला असता. पण, पावसाने विश्रांती घेतली आणि कांगारुंचा जीव भांड्यात पडला. ऑस्ट्रेलियानं 20 षटकं खेळून काढल्यानंतर पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे ऑसींची कोंडी झाली.

दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांना दमदार सलामी देण्यात अपयश आले. हिली ( 18 )  पाचव्या षटकात माघारी परतली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगनं दुसऱ्या विकेटसाठी मुनीसह संघाचा डाव सावरला. नॅडीने क्लेर्कने ही जोडी तोडली. मुनी ( 28) माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा गडगडला. जेस जॉनासेन ( 1), अ‍ॅश्लेघ गार्डनर ( 0) झटपट माघारी परतल्या. पण, एका बाजूनं लॅनिंग खिंड लढवत होती. राचेल हायनेस ( 17) हीला क्लेर्कने बाद करून ऑसींना पाचवा धक्का दिला. क्लेर्कने 19 धावांत तीन फलंदाज बाद केले.

झटपट विकेट गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेगही मंदावला. त्यामुळे त्यांना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 134 धावांवर समाधान मानावे लागले.  लॅनिंग 49 धावांवर नाबाद राहिली. मात्र पहिल्या इनिंगनंतर पावसाने हजेरी जोरदार हजेरी लावल्यामुळे दक्षिण अफ्रिकेसमोर या पुढीलप्रमाणे  विजयासाठी सुधारित लक्ष्य ठेवले जाऊ शकते. 

19 षटकांत - 130 धावा  
18 षटकांत - 125 धावा
17 षटकांत - 120 धावा
16 षटकांत - 115 धावा
15 षटकांत - 110 धावा
14 षटकांत - 104 धावा
13 षटकांत - 98 धावा
10 षटकांत- 79 धावा

Web Title: Australia vs South Africa ICC Women's T20 World Cup, Semi-Final: South Africa have kept Australia to 134/5, Unfortunately the rain has returned mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.