T20 World Cup : अ‍ॅरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ बाबत झाला निर्णय, ऑस्ट्रेलियानं जाहीर केला वर्ल्ड कपसाठी संघ!

Australia announce squad for their ICC Men's T20 World Cup : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियानं आज संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:15 AM2021-08-19T10:15:39+5:302021-08-19T10:30:32+5:30

whatsapp join usJoin us
Australia have named their squad as they chase their first Men's T20 World Cup trophy  | T20 World Cup : अ‍ॅरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ बाबत झाला निर्णय, ऑस्ट्रेलियानं जाहीर केला वर्ल्ड कपसाठी संघ!

T20 World Cup : अ‍ॅरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ बाबत झाला निर्णय, ऑस्ट्रेलियानं जाहीर केला वर्ल्ड कपसाठी संघ!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देएकही आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नसलेल्या जोश इंग्लिसची निवड ठरली सर्वांना धक्का देणारी

Australia announce squad for their ICC Men's T20 World Cup : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियानं आज संघ जाहीर केला. स्टीव्ह स्मिथ आणि अ‍ॅरोन फिंच यांच्या समावेशाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. स्मिथनं अ‍ॅशेस मालिकेला प्राधान्य देताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची शक्यता वर्तवली होती, तर दुसरीकडे अ‍ॅरोन फिंच दुखापतीनं ग्रस्त असल्यानं त्याच्या खेळण्यावरही अनिश्चितता होती. पण, ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेल्या संघात स्मिथ व फिंच या दोघांचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. (captain Aaron Finch and Steve Smith among a host of big names returning to action)

फिंच गुडघ्याच्या दुखापतीतून तर स्मिथ कोपऱ्याच्या दुखापतीतून सावरून संघात कमबॅक करणार आहेत. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन यांचेही संघात पुनरागमन होत आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघांत यांचा समावेश नव्हता. सात प्रमुख खेळाडू संघात परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली आहे. पण, ऑस्ट्रेलियाला मागील पाच ट्वेंटी-२० मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये त्यांची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  

वॉर्नर, फिंच, स्मिथ, मॅक्सवेल आणि स्टॉयनिस यांच्यासहे मिचेल मार्श, मॅथ्यू वेड व जोश इंग्लिस हे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला बळकटी देणार आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज इंग्लिसकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसला तरी तो सलामीवीर आणि मधल्या फळीत उपयुक्त ठरू शकतो. अष्टपैलू डॅन ख्रिस्टीयन, डॅनिएल सॅम्स व जलदगती गोलंदाज नॅथन एलिस यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. ( All-rounders Dan Christian and Daniel Sams, and fast bowler Nathan Ellis have been named as travelling reserves.) 



ऑस्ट्रेलियाचा संघ ( Australia squad ) - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), अ‍ॅश्टन अ‍ॅगर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा ( Aaron Finch (c), Ashton Agar, Pat Cummins (vc), Josh Hazlewood, Josh Inglis, Mitchell Marsh, Glenn Maxwell, Kane Richardson, Steve Smith, Mitchell Starc, Marcus Stoinis, Mitchell Swepson, Matthew Wade, David Warner, Adam Zampa)

ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक
२३ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता
२८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. अ गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३० ऑक्टोबर - ग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
४ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. ब गटातील उपविजेता, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता
६ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता

Web Title: Australia have named their squad as they chase their first Men's T20 World Cup trophy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.