मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका

या सामन्यासह ऑस्ट्रेलियन संघाने ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:22 IST2025-08-16T19:20:02+5:302025-08-16T19:22:52+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs SA 3rd T20I Glenn Maxwell Unbeaten 62 Runs In Just 36 Balls After Superb Catch To Dismiss Brevis Australia Wins By Two Wickets Seal Series | मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका

मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ग्लेन मॅक्सवेलच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात एक चेंडू अन् २ विकेट्स राखत विजय नोंदवत मालिका खिशात घातलीये. क्वीन्सलँड येथील कॅझली स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रेविसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ७ बाद १७२ धावा करत यजमान ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

२ चेंडूत ४ धावांची गरज असताना मॅक्सवेलनं घेतली रिस्क, अन्...



या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं ३७ चेंडूत अर्धशतक झळकावले. एका बाजूला तो दमदार बॅटिंग करत असताना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूनं ऑस्ट्रेलियाच्या तगड्या फलंदाजीला सुरुंग लावला.  पण मॅक्सवेल मात्र सर्वांना पुरून उरला. अखेरच्या षटकात २ विकेट्स हातात असताना ऑस्ट्रेलियाला १० धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूवर ६ धावा घेतल्यावर अखेरच्या २ चेंडूत ऑस्ट्रेलियाला ४ धावांची गरज होती. सामना रंगतदार अवस्थेत असताना पाचव्या चेंडूवर रिव्हर्स स्विप फटका मारत मॅक्सवेलनं संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यासह ऑस्ट्रेलियन संघाने ३ सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली.

Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

नाबाद अर्धशतकी खेळीशिवाय सुपर कॅच ठरला टर्निंग पाइंट

धावांचा पाठलाग करताना एका बाजूनं विकेट्स पडत असताना ग्लेन मॅक्सवेलनं आपल्या अंदाजात जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पेश केला. त्याने ३२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. या खेळीशिवाय क्षेत्ररक्षणावेळी त्याने धोकादायक ठरत असलेल्या ब्रेविसचा अफलातून कॅच घेतला. जो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून ब्रेविसनं २६ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. नेथन एलिस घेऊन आलेल्या १२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅक्सवेलनं त्याचा अप्रतिम झेल टिपला. जर तो लवकर बाद झाला नसता तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने धावफलकावर २०० पार धावा सहज लावल्या असत्या.

डेविड वॉर्नरच्या दोन विक्रमांशी साधली बरोबरी

ग्लेन मॅक्सवेल याने क्षेत्ररक्षण करत असताना ब्रेविसचा कॅच घेत वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाकडून आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मॅक्सवेलच्या खात्यात ६२ झेलची नोंद झाली आहे. वॉर्नरनही तेवढेच कॅच घेतले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून टी-२- मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर होण्याच्या वॉर्नरच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. दोघांनी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये प्रत्येकी १२-१२ वेळा सामनावीरचा पुरस्कार पटकवलाय.

Web Title: AUS vs SA 3rd T20I Glenn Maxwell Unbeaten 62 Runs In Just 36 Balls After Superb Catch To Dismiss Brevis Australia Wins By Two Wickets Seal Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.