AUS VS PAK : ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली; मालिका खिशात टाकली

ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धो धो धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 04:57 PM2019-11-08T16:57:07+5:302019-11-08T16:57:35+5:30

whatsapp join usJoin us
AUS VS PAK : Australia comfortable 10-wicket victory over Pakistan secures a 2-0 series win  | AUS VS PAK : ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली; मालिका खिशात टाकली

AUS VS PAK : ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली; मालिका खिशात टाकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धो धो धुलाई केली. पाकिस्तानचे 107 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता सामना जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियानं हा सामना 10 विकेट्स आणि 49 चेंडू राखून जिंकला. अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार फटकेबाजी केली. पाकिस्तानचा हा सलग सातवा ट्वेंटी-20तील पराभव आहे. 

पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीचे सत्र तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही कायम राहिले. केन रिचर्डसन,  मिचेल स्टार्क आणि सीन अबॉट यांच्या भेदक माऱ्यानं पाकिस्तानच्या फलंदाजाला हतबल केलं. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा इफ्तिखर अहमदने चिवट खेळ करताना संघाला शंभरी पार पल्ला गाठून दिला. पाकिस्तानला निर्धारित 20 षटकांत केवळ 8 बाद 106 धावाच करता आल्या. बाबर आझम ( 6), मोहम्मद रिझवान ( 0) या दोघांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवून मिचेल स्टार्कनं पाकला मोठा धक्का दिला. त्यानंतर अबॉट व रिचर्डसन यांनी पाकच्या अन्य फलंदाजांना गुंडाळलं. इफ्तिखरने 37 चेंडूंत 45 धावांची संयमी खेळी करताना संघाला 106 धावांपर्यंत मजल मारून दिली. रिचर्डसननं 18 धावांत 3 विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने खणखणीत षटकार मारून डावाची सुरुवात केली. त्याला कर्णधार अॅरोन फिंचनेही दोन चौकार लगावले. पण दुसऱ्याच षटकात वॉर्नरला बाद करण्याची सोपी संधी पाकच्या इमाम उल हकनं गमावली. वॉर्नरने टोलावलेला चेंडू इमामनं सुरेखपणे अडवला, पण त्याला वॉर्नरला धावबाद करता आले नाही. त्यानंतर वॉर्नर आणि फिंचने तुफानी फटकेबाजी केली. फिंच 36 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून 52 धावा चोपल्या, तर वॉर्नरने 35 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 48 धावा केल्या.

 

Web Title: AUS VS PAK : Australia comfortable 10-wicket victory over Pakistan secures a 2-0 series win 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.