AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...

टक्कर झाल्यावरही कॅरीनं अप्रतिम कॅच पकडल्यावर लाबुशेन याची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:44 IST2025-12-04T19:42:36+5:302025-12-04T19:44:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
AUS vs ENG Ashes 2nd Test Alex Carey And Marnus Labuschagne Sprint Back To Take Catch Collided Mid Air Watch Video | AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...

AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...

AUS vs ENG Ashes 2nd Test Alex Carey And Marnus Labuschagne Sprint To Take Catch : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पिंक बॉल टेस्ट अर्थात डे नाईट कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात इंग्लंडकडूनजो रूटनं नाबाद १३५ (२२२) धावा करत दमदार शतक ठोकलं. सलामीवीर झॅक क्राउलीनंही ९३ चेंडूत ७६ धावा करून चांगली सुरुवात दिली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कनं ६ विकेट घेत गोलंदाजीची धडाकेबाज कामगिरी केली. या तिघांशिवाय पहिल्या दिवसाच्या खेळात अ‍ॅलेक्स कॅरीनं अप्रतिम कॅचसह हवा केल्याचे पाहायला मिळाले. एक झेल टिपताना कॅरी आणि लाबुशेन एकाच वेळी हवेत झेपावताना हवेत धडकले, तरीही कॅरीनं अप्रतिमरीत्या कॅच पूर्ण केला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पहिल्या दिवसाच्या खेळात मैदानात नेमकं काय घडलं?


इंग्लंडच्या डावातील ६७ व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या गस एटिंकस याने स्टार्कनं टाकलेल्या चेंडूवर पुल शॉट खेळला. चेंडू हवेत उडाल्यावर कॅरी आणि लाबुशेन दोघेही चेंडूकडे बघत कॅच घेण्यासाठी धाव गेले. दोघांनी एकाच वेळी हवेत उडी मारली. यात दोघे एकमेकांना धडकले. पण त्यातही कॅरीनं चेंडू पकडला अन् गस एटिंकसच्या खेळीला ब्रेक लावला.  टक्कर झाल्यावरही कॅरीनं अप्रतिम कॅच पकडल्यावर लाबुशेन याची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती. 

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!

गोलंदाजीत स्टार्कचा 'सिक्सर'सह जलवा दिसला; पण जो रुटनं नाबाद विक्रमी शतकी खेळीसह पहिला दिवस गाजवला

पहिल्या दिवसाच्या खेळात मिचेल स्टार्कनं ६ विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. पहिल्या षटकात त्याने दोन विकेट्स घेतल्या. एवढेच नाही तर १९ षटकांच्या कोट्यात त्याने ७१ धावा खर्च करत सर्वोत्तम गोलंदाजी केली. पण इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट दिवसाअखेर शतकी खेळीसह नाबाद परतला. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने  संघाचा डाव सावरणारी सर्वोत्तम खेळी करत संघाला मोठा आधार दिवसाअखेर  ९ विकेट्सच्या मोबदल्यात ३२५ धावा करत पहिला दिवस गाजवला. जो रुटनं ऑस्ट्रेलियन मैदानात पहिलं शतक साजरे केले. ४० व्या कसोटी शतकासह त्याने कमी वयात हा टप्पा गाठण्याा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
 

Web Title : एशेज टेस्ट: कैरी ने लाबुशेन से टकराकर शानदार कैच लिया!

Web Summary : एशेज टेस्ट में, कैरी ने लाबुशेन से टकराकर एक शानदार कैच लिया। रूट के शतक और स्टार्क के छह विकेट दिन के मुख्य आकर्षण रहे। इंग्लैंड ने 325/9 रन बनाए।

Web Title : Ashes Test: Carey's Stunning Catch After Collision with Labuschagne!

Web Summary : In the Ashes Test, Carey took a remarkable catch, colliding with Labuschagne. Root's century and Starc's six wickets highlighted the day. England scored 325/9.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.