अनुष्का शर्माचे क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण, दिसणार निळ्या जर्सीत!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:15 PM2020-01-11T16:15:22+5:302020-01-11T16:16:11+5:30

whatsapp join usJoin us
Anushka Sharma to play the role of Jhulan Goswami in her biopic | अनुष्का शर्माचे क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण, दिसणार निळ्या जर्सीत!

अनुष्का शर्माचे क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण, दिसणार निळ्या जर्सीत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत स्टेडियममध्ये उपस्थित राहून विराटला प्रोत्साहन देणारी अनुष्का निळ्या जर्सीत दिसणार आहे. क्रिकेटनं विराट आणि अनुष्काला एकत्र आणलं. सध्या सर्वात क्यूट कपल म्हणून विरुष्काचे नाव आघाडीवर आहे. विराटच्या टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यावर अनुष्का अनेकदा दिसली आहे. पण, आता अनुष्का क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण करताना दिसणार आहे.

 

भारतीय संघाची सर्वात

यशस्वी गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्यावर तयार होत असलेल्या बायोपिकमध्ये अनुष्का प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. भारतीय महिला संघाच्या यशस्वी वाटचालीत झुलनचा महत्त्वाचा वाटा आहे. तिचा हा क्रिकेटप्रवास चित्रपटाच्या रूपानं सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात झुलनची भूमिका अनुष्का शर्मा निभावणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत्येय.   


37 वर्षीय झुलननं 2002मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले आणि जगातील सर्वात यशस्वी जलदगती गोलंदाज म्हणून तिनं नाव कमावलं. तिनं 10 कसोटी, 182 वन डे आणि 68 ट्वेंटी-20 सामन्यांत 321 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान झुलननं पटकावला आहे.

झुलन निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती भविष्यात गोलंदाज प्रशिक्षक किंवा सल्लागार म्हणून काम पाहू शकते. बॉलिवूडमध्ये अनेक खेळाडूंवर बायोपिक निघाले आहेत. महेंद्रसिंग धोनी, मेरी कोम, भाग मिल्खा भाग या बायोपिकनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.  

Web Title: Anushka Sharma to play the role of Jhulan Goswami in her biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.