anand Mahindra Gifted Thar To T Natarajan Fast Bowlers Reply Will Win Your Heart | आनंद महिंद्रांनी वचन पाळलं! टी.नटराजनला गिफ्ट केली 'महिंद्रा थार'; रिटर्न गिफ्टही मिळालं

आनंद महिंद्रांनी वचन पाळलं! टी.नटराजनला गिफ्ट केली 'महिंद्रा थार'; रिटर्न गिफ्टही मिळालं

Anand Mahindra, T. Natarajan Thar: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या युवा खेळाडूंनी ब्रिस्बेन कसोटीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संघातील सहा युवा खेळाडूंना 'महिंद्रा थार' ही दमदार कार गिफ्ट करणार असल्याचं जाहीर केलं होतं. आनंद महिंद्रा यांनी दिलेलं वचन पाळलं असून भारतीय संघाचा युवा गोलंदाज टी.नटराजन याला 'महिंद्र थार' कार गिफ्ट मिळाली आहे. (Anand Mahindra Gifted Thar To T Natarajan Fast Bowlers Reply Will Win Your Heart)

"वर्ल्डकप जिंकून आम्ही कुणावर उपकार केले नाहीत"; गौतम गंभीरचं वादग्रस्त विधान, असं का म्हणाला गौतम?

ऑस्ट्रेलियात भारतानं यावेळी सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण यावेळीचा विजय अतिशय महत्वाचा ठरला. कारण भारतीय संघातील महत्वाचे खेळाडू जखमी झाल्यानं अखेरच्या कसोटीत खेळू शकले नव्हते. विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतला होता. तर ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव दुखापतग्रस्त झाले होते. त्यात ब्रिस्बेन कसोटीत रविंद्र जडेजा आणि आर.अश्विन देखील दुखापतीमुळे बाहेर होते. संघाचे अनुभवी खेळाडू बाहेर असूनही भारताच्या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं. 

...तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण भारतीय संघात नसते; वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

भारतीय संघाचा ऐतिहासिक विजयानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराज, टी.नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना 'महिंद्रा थार' कार गिफ्ट करणार असल्याचं जाहीर केलं होतं. यात आज टी.नटराजन यानं ट्विट करुन महिंद्राची 'थार' कार दिल्याबद्दल आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. इतकंच नव्हे, तर टी.नटराजन यानं आनंद महिंद्रा यांना रिटर्न गिफ्ट देखील पाठवलं आहे. 

"भारतासाठी क्रिकेट खेळणं माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण होता. या रस्त्यावरुन पुढे जाणं माझ्यासाठी खरंच खूप वेगळं आहे. या प्रवासात मला जे प्रेम आणि आपलेपणा मिळाला त्याची अनुभूती घेऊन मला खूप आनंद होत आहे. लोकांनी दिलेलं समर्थन आणि आत्मविश्वास दिल्यामुळे मला पुढे जाण्यास मदत मिळाली", असं ट्विट टी.नटराजन यानं केलं आहे. यासोबतच त्यानं आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट केलेली कार चालवली आणि त्याबद्दलही आभार व्यक्त केले.

"मी आज सुंदर महिंद्रा थार कार ड्राइव्ह करत घरी आलो. आनंद महिंद्रा यांचा मी खूप आभारी आहे. त्यांनी माझ्या प्रवासाची दखल घेतली आणि माझा आत्मविश्वास वाढविण्याचं काम केलं आहे. क्रिकेटप्रती तुमचं खूप प्रेम आहे. तुमच्यासाठी मी ब्रिस्बेन कसोटीतील माझी जर्सी स्वाक्षरी करुन भेट म्हणून पाठवत आहे", असं ट्विट टी. नटराजन यानं केलं आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anand Mahindra Gifted Thar To T Natarajan Fast Bowlers Reply Will Win Your Heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.