Mustafizur Rahman Mohammad Nabi, IPL 2026: अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू मोहम्मद नबी सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. तो त्याचा १९ वर्षांचा मुलगा हसन इसाखिलसोबत सामन्यात खेळला. वडील आणि मुलगा एकत्र खेळल्यामुळे त्यांची चर्चा रंगली. क्रिकेट इतिहासातील एकत्र खेळणारी ही पहिलीच पिता-पुत्र जोडी आहे. नबी आणि त्याचा मुलगा हसन हे दोघेही बीपीएलमध्ये नोआखाली एक्सप्रेस संघाचा भाग आहेत. या ऐतिहासिक कामगिरीनंतर, एका पत्रकार परिषदेत मुस्तफिजुर रहमानबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मोहम्मद नबी संतापला आणि त्याचा संताप कॅमेऱ्यात कैद झाला.
बांगलादेशमध्ये मोहम्मद नबी का नाराज आहे?
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून काढून टाकण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाबद्दल मोहम्मद नबीला प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला विचारण्यात आले होते की मुस्तफिजूर रहमानसोबत जे घडले, ते बरोबर आहे का? पत्रकाराकडून हा प्रश्न ऐकून मोहम्मद नबी संतापला. तो थोडासा रागानेच म्हणाला, "या प्रश्नाचा माझ्याशी काय संबंध? माझा मुस्तफिजूर रहमानशी काय संबंध? या प्रश्नाचे उत्तर मी देण्याची गरज नाही. तो चांगला गोलंदाज आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीचा प्रश्न विचारत आहात त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी त्याचं उत्तर कशाला देऊ?" अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला.
मुस्तफिजूर रहमानचा नेमका वाद काय?
बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या कारवाईनंतर, बीसीबीने आयसीसीला भारतात २०२६ चा टी२० विश्वचषक न खेळण्याची विनंती केली, जी फेटाळण्यात आली. बांगलादेशला त्यांचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवायचे होते, जे या स्पर्धेचे दुसरे यजमान आहेत. तथापि, आयसीसीने सांगितले की त्यांना त्यांचे सामने वेळापत्रकानुसार खेळवावे लागतील. पण, क्रिकबझच्या अलीकडील अहवालानुसार, बांगलादेशचे टी२० विश्वचषक सामने श्रीलंकेत हलवले जातील, परतु ते कोलकाता आणि मुंबईहून चेन्नई आणि तिरुवनंतपुरम येथे हलवले जाऊ शकतात.