Pakistan T20 World Cup squad : शोएब मलिकला वर्ल्ड कप संघातून डच्चू; मुख्य प्रशिक्षकासह, गोलंदाजी प्रशिक्षकाचाही राजीनामा!

Pakistan T20 World Cup squad : पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांच्या संघाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 03:23 PM2021-09-06T15:23:09+5:302021-09-06T15:23:54+5:30

whatsapp join usJoin us
At 12 pm, Pakistan announced the T20 World Cup squad and at 2.30 pm, Head coach and Bowling coach of Pakistan resigned  | Pakistan T20 World Cup squad : शोएब मलिकला वर्ल्ड कप संघातून डच्चू; मुख्य प्रशिक्षकासह, गोलंदाजी प्रशिक्षकाचाही राजीनामा!

Pakistan T20 World Cup squad : शोएब मलिकला वर्ल्ड कप संघातून डच्चू; मुख्य प्रशिक्षकासह, गोलंदाजी प्रशिक्षकाचाही राजीनामा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan T20 World Cup squad : पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांच्या संघाची घोषणा केली. दुपारी १२ वाजता पाकिस्ताननं वर्ल्ड कप संघ जाहीर केला आणि २.३० वाजता संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी राजीनामा दिला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये घडलेल्या या उलथापालथीनं चाहते मात्र निराश झाले आहेत. ( At 12 pm, Pakistan announced the T20 World Cup squad and at 2.30 pm, Head coach and Bowling coach of Pakistan resigned ) 

पाकिस्नानं जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात अनुभवी खेळाडू शोएब मलिक याला संधी देण्यात आलेली नाही. २००७च्या पहिल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मलिक व महेंद्रसिंग धोनी यांनी आपापल्या संघाचे नेतृत्व सांभाळले होते आणि २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हे दोघही आता खेळणार नाहीत. पाकिस्तान प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मलिकशिवाय उतरणार आहे. पाकिस्ताननं संघ जाहीर केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी राजीनामा दिला.

''जमैकात क्वारंटाईन कालावधीत मी मागील २४ महिन्यांचा आढावा घेतला आणि त्यावेळी हे बायो-बबलचे सत्र असेच सुरू राहणार असल्याचे मला जाणवले. त्यामुळे मला कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही, त्यांना वेळ देता यावा याकरिता मी राजीनामा देत आहे,''असे मिसबाह उल हकनं सांगितलं.

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ
आसीफ अली आणि खुशदील शाह हे दोन चेहरे वर्ल्ड कप संघात दिसल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनुभवी यष्टिरक्षक  सर्फराज अहमद याच्याएवजी संघानं आझम खान याला पसंती दिली आहे. फाखर झमान, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादीर यांना संघात स्थान पटकावता आलेले नाही, परंतु त्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे.   

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन,  शाहिन शाह आफ्रिदी ( Pakistan's squad for T20 World Cup: Babar (C), Shadab, Hafeez, Shaheen Afridi, Rauf, Asif Ali, Azam Khan, Imad, Khushdil, Hasnain, Rizwan, Nawaz, Wasim and Sohaib, Reserves - Usman Qadir, Fakhar Zaman and Dhani.) 
 

Web Title: At 12 pm, Pakistan announced the T20 World Cup squad and at 2.30 pm, Head coach and Bowling coach of Pakistan resigned 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.