छ. संभाजीनगरला बायोफार्मा इन्स्टिट्यूट अन् एम्स मिळणार? एकात्मिक विकास योजनेतून शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:40 IST2026-02-02T14:39:15+5:302026-02-02T14:40:40+5:30

छत्रपती संभाजीनगर आर्थिक वाढीचे नवे केंद्र ग्रोथ इंजिन म्हणून विकसित होण्याची पाऊल यातून उचलले जातील.

Will Chhatrapati Sambhajinagar get Biopharma Institute and AIIMS? Will it benefit from Integrated Development Scheme? | छ. संभाजीनगरला बायोफार्मा इन्स्टिट्यूट अन् एम्स मिळणार? एकात्मिक विकास योजनेतून शक्य

छ. संभाजीनगरला बायोफार्मा इन्स्टिट्यूट अन् एम्स मिळणार? एकात्मिक विकास योजनेतून शक्य

छत्रपती संभाजीनगर : केंद्रशासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शहरांचा एकात्मिक विकास ही संकल्पना मांडली आहे. त्या योजनेत शहरात नवीन मेडिकल कॉलेजेस आणि एम्ससारख्या संस्था स्थापन करण्यावर केंद्र शासनाचा या याेजनेतून भर आहे. अशा संस्था शहरात येण्यासाठी स्थानिक नेतृत्वांचे प्रयत्न गरजेचे असतील. टू-टीअर शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाकडून सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर आर्थिक वाढीचे नवे केंद्र ग्रोथ इंजिन म्हणून विकसित होण्याची पाऊल यातून उचलले जातील.

ई-गव्हर्नन्स, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा यांसारख्या सुविधांचा यात समावेश आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठीही अर्थसाहाय्य मिळेल. अर्थसंकल्पात शहरांच्या विकासासाठी मोठी तरतूद केलेली असून, त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होणे शक्य आहे.

अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये टू-टीअर आणि थ्री-टीअर शहरांसाठी ‘सिटी इकॉनॉमिक रिजन’ विकसित करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. यासाठी प्रत्येक सीईआरला पाच वर्षांसाठी ५,००० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. यातून काही वाटा छत्रपती संभाजीनगरच्या पदरात पडण्यासाठी स्थानिक नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

यापूर्वी शहर स्मार्ट सिटीत
स्मार्ट सिटी उपक्रमातून शहराला १ हजार कोटींच्या आसपास केंद्र शासनाचे अनुदान मिळाले. आता टू टीअरच्या निकषात शहर पात्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १४ लाखांच्या आसपास आहे. ज्या शहरात मध्यम खर्च, उत्तम पायाभूत सुविधा, नोकरीच्या संधी आणि सुधारित जीवनशैली उपलब्ध आहे, त्या शहरांसाठी ही योजना आहे, त्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर आहे.

टू टीअरच्या श्रेणीत शहर येते...
छत्रपती संभाजीनगर हे शहर टू टीअरच्या श्रेणीत येते. त्यामुळे या श्रेणीसाठी केंद्र शासनाने केलेल्या तरतुदींचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करता येतील.
- जी.श्रीकांत, मनपा प्रशासक.

Web Title : छत्रपति संभाजीनगर: एकीकृत विकास से बायोफार्मा संस्थान, एम्स संभव?

Web Summary : छत्रपति संभाजीनगर का लक्ष्य एकीकृत विकास है, जिससे बायोफार्मा संस्थान और एम्स प्राप्त करने की संभावना है। केंद्र सरकार का वित्त पोषण दो-स्तरीय शहरों के विकास पर लक्षित है, यदि स्थानीय नेता प्रयास करें तो अवसर मिलेंगे। शहर नए मानदंडों के तहत योग्य है।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Biopharma Institute and AIIMS possible via integrated development?

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar aims for integrated development, potentially gaining a Biopharma Institute and AIIMS. Central funding targets two-tier city growth, offering opportunities if local leaders pursue them. The city qualifies under new criteria.