ईद-मिलनचे निमित्त, प्रतिष्ठांच्या भेटीगाठी; औरंगाबादेत तिन्ही उमेदवारांचा मुस्लिम मतांवर डोळा!

By मुजीब देवणीकर | Published: April 17, 2024 06:18 PM2024-04-17T18:18:22+5:302024-04-17T18:20:14+5:30

लोकसभा निवडणुकीत शहरी भागातील मुस्लिम मतांची भूमिका यंदा निर्णायक ठरणार आहे.

The occasion of Eid-Milan, meeting of dignitaries; In Aurangabad, all three candidates eye on Muslim votes! | ईद-मिलनचे निमित्त, प्रतिष्ठांच्या भेटीगाठी; औरंगाबादेत तिन्ही उमेदवारांचा मुस्लिम मतांवर डोळा!

ईद-मिलनचे निमित्त, प्रतिष्ठांच्या भेटीगाठी; औरंगाबादेत तिन्ही उमेदवारांचा मुस्लिम मतांवर डोळा!

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिम, दलित मते निर्णायक ठरतात. मुस्लिम मते आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एमआयएम, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ईद-मिलनचे निमित्त साधून उमेदवार मुस्लिमबहुल भागातील प्रतिष्ठित मंडळींच्या भेठीगाठी घेत आहेत. विद्यमान खासदारांच्या पाठीशी दलित मते नसल्याचे लक्षात येताच महाविकास आघाडीने थेट मुस्लिम मतांना सुरुंग लावायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अद्याप महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही. महाविकास आघाडी, वंचित आणि एमआयएमने उमेदवार घोषित केले. या उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून प्रचाराला प्रारंभही केला. मागील लोकसभा निवडणुकीत हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. मुस्लिम-दलित मते एमआयएमकडे गेली. त्यामुळे एमआयएमला विजय मिळाला. यंदा राजकीय समीकरणे बरीच बदलली आहेत. महायुती वगळता अन्य तिन्ही उमेदवार मुुस्लिम मते मिळविण्यासाठी सरसावल्याचे चित्र दिसू येत आहे.

याचे उदाहरण म्हणजे शहरातील मुस्लिमांची सर्वांत मोठी संघटना म्हणजे मुस्लिम नुमाईंदा कौन्सिल होय. दोन दिवसांपूर्वी कौन्सिलच्या अध्यक्षांना त्यांच्या घरी भेटायला महाविकास आघाडीचे उमेदवार दाखल झाले. ते बाहेर पडून दोन मिनिटे झालेले असतानाच वंचितचे उमेदवारही पोहोचले. याला कारण होते ईदनिमित्त सदिच्छा भेटीचे. एमआयएम पक्षानेही हक्काच्या मुस्लिम मतांचे विभाजन होणार नाही, याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. यापूर्वी ओवेसी काही भागात पदयात्रा, एक जाहीर सभा करून निघून जात असत. यंदा त्यांनीही ४० अंश तापमानात घाम गाळायला सुरुवात केली.

शहरी भागातील मुस्लिम मतदान
लोकसभा निवडणुकीत शहरी भागातील मुस्लिम मतांची भूमिका यंदा निर्णायक ठरणार आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीकडे लक्ष घातल्यास लक्षात येते की, जवळपास १ लाख ८७ हजारांहून मते एआयएमला मिळाली होती. याच निवडणुकीत वंचितला मध्य मतदारसंघात २७ हजार, पश्चिममध्ये २५ हजार मते पडली होती. पूर्वमध्ये एमआयएमला पाठिंबा दिला होता.

असे झाले होते मतदान
विधानसभा----पक्ष- पडलेली मते------टक्केवारी

पूर्व - ----एमआयएमला--- ८०, ०३६---४०.९७
मध्य- एमआयएम- ------६८,३२५-----३५
पिश्चित---एमआयएम---३९,३३६ -----१९.७१

Web Title: The occasion of Eid-Milan, meeting of dignitaries; In Aurangabad, all three candidates eye on Muslim votes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.